Posts

Showing posts from August, 2017
Image
महाअवयवदान जनजागृती महारॅली संपन्न लातूर, दि.29: महाअवयवदान अभियानांतर्गत लातूर शहरात आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीस लातूरचे महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयापासून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्रीकांत गोरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक श्री. कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक शैलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, डॉ. व्ही. एस. सिरसाठ  आदींची उपस्थिती होती. या रॅलीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - मिनी मार्केट - शिवाजी चौक मार्गे,  क्रीडा संकुल लातूर येथे समारोप झाला. या रॅलीत देशीकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालय, न्यू व्हिजन नर्सिंग स्कूल, वेदांत नर्सिंग कॉलेज, शासकीय वैद्यकीय कॉलेज, मधील विद्यार्थ्यांची , डॉक्टर्स व कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी अवयवदान विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.  रॅलीची सांगता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. गोरे यां...