मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर, दि. 28 :- मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा उद्योग क्षेत्रातील महत्वपूर्ण रेल्वे कोच निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हरंगुळ एमआयडीसी क्षेत्रात झाले. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, राज्याचे कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री सभांजी पाटील-निलंगेकर, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. रेल्वे कोच कारखान्याच्या भूमिपूजनानंतर कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सुरेश पवार, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुजितसिंह ठाकूर, मराठवाडा वि...
Posts
Showing posts from March, 2018