Posts

Showing posts from November, 2016
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम             लातूर,दि. 29: मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये दिनांक 23 मार्च 2011 च्या अधिसुचनेप्रमाणे स्कुल बस नियमाप्रमाणे शालेय विद्यार्थ्याची वाहतूक न करणाऱ्या दोषी वाहनांवर लातूर प्रादेशिक परिवहन  कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून  विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये नियमाप्रमाणे शालेय विद्यार्थ्याची वाहतूक न करणाऱ्या दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे,  अशी माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. भालेराव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.              शालेय विद्यार्थ्याचे वाहतूक करणाऱ्या  सर्व वाहनधारकांनी  स्कुलबस वाहतूकीचा परवाना असल्याशिवाय आपली वाहने रस्त्यावर आणु नयेत. तसेच स्कुलबस परवाना काढुनच विद्यार्थ्याची वाहतूक करावी.  आपल्या वाहनासोबत वाहनाची सर्व वैद्य कागदपत्रे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र (वाहनांचे पी.यु.सी. प्रमाणपत्र,परवाना, कर पावत्या इत्यादी) ठेवाव्यात. जेणेकरून तपासणी दरम्यान आपणास व विद्यार्थ्याना नाहक त्रास होणार नाही.        पालकांनी ज्या वाहनांना