शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम
  
         लातूर,दि. 29: मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये दिनांक 23 मार्च 2011 च्या अधिसुचनेप्रमाणे स्कुल बस नियमाप्रमाणे शालेय विद्यार्थ्याची वाहतूक न करणाऱ्या दोषी वाहनांवर लातूर प्रादेशिक परिवहन  कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून  विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये नियमाप्रमाणे शालेय विद्यार्थ्याची वाहतूक न करणाऱ्या दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे,  अशी माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. जी. भालेराव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
             शालेय विद्यार्थ्याचे वाहतूक करणाऱ्या  सर्व वाहनधारकांनी  स्कुलबस वाहतूकीचा परवाना असल्याशिवाय आपली वाहने रस्त्यावर आणु नयेत. तसेच स्कुलबस परवाना काढुनच विद्यार्थ्याची वाहतूक करावी.  आपल्या वाहनासोबत वाहनाची सर्व वैद्य कागदपत्रे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र (वाहनांचे पी.यु.सी. प्रमाणपत्र,परवाना, कर पावत्या इत्यादी) ठेवाव्यात. जेणेकरून तपासणी दरम्यान आपणास व विद्यार्थ्याना नाहक त्रास होणार नाही.
       पालकांनी ज्या वाहनांना स्कुलबसचा परवाना नाही तसेच  स्कुलबसमध्ये आसनक्षमतेपेक्षा जास्त्‍ विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते अशा वाहनांमध्ये  पाल्यांना शाळेत बसवून पाठवू नये.  तसेच ऑटोरिक्षामध्ये पाच विद्यार्थ्याची वाहतूक नियमानुसार करता येते त्यामुळे ऑटोरिक्षामधून आपल्या पाल्यांना पाठविताना त्या ऑटोरिक्षामध्ये 5 पेक्षा अधिक विद्यार्थ्याची वाहतूक केली जाते अथवा नाही याची खात्री करूनच आपल्या पाल्याना ऑटोरिक्षामधून शाळेस पाठवावे ,असे आवाहन लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी  कार्यालयाकडून करण्यात येत आहे.


*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु