महिलांनी इंटरनेटचा वापर करताना स्वतःची ओळख जाहीर करू नये -नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे
*अहमदपूर येथील "सायबर सेफ वुमन" कार्यशाळेस महिला व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि 3:- महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी अत्याचारासंदर्भात तसेच कायद्यासंदर्भात महिला व विद्यार्थिनी मध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शासनाने आयोजित केलेला सायबर सेफ वुमन हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. तरी महिला व विद्यार्थिनींनी इंटरनेटचा वापर करत असताना आपली स्वतःची ओळख जाहीर करू नये. तसेच डिजिटल माध्यमाचा वापर करताना सायबर सुरक्षितता याबाबत जागृत राहावे असे, आवाहन अहमदपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती अश्विनी कासनाळे यांनी केले. अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा पोलीस दल, जिल्हा माहिती कार्यालय व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेफ वूमन बाबतच्या कार्यशाळेत श्रीमती कासनाळे बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील, तहसीलदार अरुणा संगेवार, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. जाध...