Posts

खाजगी बसेसमध्ये अवाजवी भाडेवाढ केल्यास करता येणार तक्रार

  खाजगी बसेसमध्ये अवाजवी भाडेवाढ केल्यास करता येणार तक्रार     लातूर, दि. 18   :   राज्यातील नागरीक दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यासाठी ते खाजगी प्रवासी बसेसचा वापर करीत असतात. त्यादरम्यान खाजगी प्रवासी बसेस चालककाडून मनमानी भाडे वाढ आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची लुबाडणूक होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने शासनाने 27 एप्रिल, 2018 रोजी निर्णय जारी करुन राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांची कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतुकीच्या सद्यास्थितीच्या प्रती किलो मीटर भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही , असे निश्चित केले आहेत. भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवाशी भाडे आकारल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी rto.24-mh@gov.in या ई-मेल आयडीचा वापर करावा. त्यासोबत प्रवास कोठून कुठपर्यंत केला त्याची माहिती, तिकीट , वाहनाचा क्रमांक प्रवाशांनी सदर तपशिलासह तक्रार दाखल केल्यास संबंधित वाहना विरोधात का

कु. पुनम पवार यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  कु. पुनम पवार यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                 लातूर,दि.18 (जिमाका)-  बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.पूनम शिवाजी पवार (जन्म दिनांक १० मार्च, २०१० १४ वर्षे ०७ महिने)  हिला १३ जुलै, २०२३ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची ४ फूट १० इंच व ती शरीराने सडपातळ आहे. तिच्या उजव्या ओठाखली  तीळ आहे.   माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. परशुराम खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  कु. परशुराम खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  लातूर,दि.18 (जिमाका)-  बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. परशुराम प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ११ जानेवारी, २०१३,  वय ११ वर्षे ०७ महिने)  याला दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. हा  रंगाने सावळा असून चेहरा गोल आहे. उंची ४ फूट ३३ इंच व शरीराने सडपातळ आहे. त्याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला लागलेले निशाण आहे.   माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. राणी खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  कु. राणी खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  लातूर,दि.18 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. राणी प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ४ मे, २०१०, वय १४ वर्षे ०४ महिने) हिला १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग सावळा ,  चेहरा लंबगोलाकार, उंची ५ फूट २५ इंच, शरीराने सडपातळ आहे.   माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील  धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. सविता जाधव यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

                                            कु. सविता जाधव यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन   लातूर,दि.18 (जिमाका)-    बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. सविता बंडू जाधव (जन्म दिनांक  २५ जानेवारी, २०१० वय १४ वर्षे ०६ महिने) हीला १८ जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग गोरा चेहरा लंब गोलाकार, उंची ४ फूट ७ इंच,  शरीराने सडपातळ व तिच्या उजव्या तळहातावर तीळ आहे.   तिच्या  माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह हासेगाव ता. लातूर अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ***   

निवडणूक पत्रक, भित्तीपत्रिका छपाई करणाऱ्या मुद्रणालय चालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन

                                                          निवडणूक पत्रक, भित्तीपत्रिका छपाई करणाऱ्या मुद्रणालय चालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 18   :   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याप्रमाणे हे छपाई कामे करणारे मुद्रणालय चालकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी (उपचिटणीस शाखा) यांच्याकडे विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र त्वरीत सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व प्रेसधारकांनी याबाबतीत अधिक माहितीसाठी आणि प्रज्ञिापत्रासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालये येथे उपचिटणीस शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र करुन दिल्याशिवाय विधानसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांच्यासाठी छपाई करुन दिल्यास संबंधित प्रेसधारका विरुध्द लोकप्रतिनिधीत्व

शासकीय कार्यालय परिसरात प्रतिबंधात लागू

  शासकीय कार्यालय परिसरात प्रतिबंधात लागू लातूर, दि. 1 9   :   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा-2024 कार्यक्रम जाहीर झाला आहे.  दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने लातूर सभा, मिरवणूका, निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित  करण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  आदेश निर्गमित केले आहेत. निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, निदर्शने करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आदी . कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 25 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. *****