पदवीधर मतदार संघ मतदार यादीमध्ये 18 डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार
पदवीधर मतदार संघ मतदार यादीमध्ये
18 डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार
· दावे व हरकती दाखल करण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत
लातूर, दि. 9 (जिमाका) : भारत निवडणूक आओग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदान याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत नमुना 18 प्राप्त झालेले अर्जांची प्रारूप यादी 3 डिसेंबर, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीवर 18 डिसेंबर 2025 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
दावे व हरकती दाखल करताना नमुना अर्ज 7 व 8 मध्ये हरकती दाखल करता येतील. तसेच मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी 18 डिसेंबर पर्यंत नमुना अर्ज 18 ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने सादर करता येणार आहे. नमुना अर्ज 18 ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी htps://www.mahaelection.gov.in/citizen/login लिंकचा वापर करावा. त्या अनुषंगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदर संघाकरिता नव्याने तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव समावेश करण्यासाठी लातूर तालुक्यातील सर्वसाधारण रहिवास असलेल्या सर्व पदवीधारकांनी नमुना अर्ज 7 व 8 मध्ये दावे व हरकती मतदान केंद्रनिहाय नियुक्त पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत. तसेच मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज 18 भरून पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत, असे लातूरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी नऱ्हे व लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment