‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु
‘नाफेड’मार्फत मूग,उडीद
व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु
§
10
ऑक्टोबरपासून मूग, उडीद खरेदी
§
15
ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी
लातूर, दि.7 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने
हंगाम 2024-2025 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग,
उडीद व सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबर, 2024 पासून
सुरु करण्यात आली असून प्रत्यक्षात मूग,उडिद खरेदी दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 आणि सोयाबीन
खरेदी 15 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे.
केंद्रीय नोडल एजेन्सी नाफेडमार्फत अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा,
धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, परभणी, पुणे, सांगली,
सातारा, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात खरेदी केली जाणार आहे.
नाफेड कार्यालयाने 19 जिल्ह्यातील 146 खरेदी केंद्राना मंजूरी
दिली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात लातूर येथील जागृती प्रगती बीजो-उत्पादन प्रक्रिया
पणन सहकारी संस्था, लातूर तालुक्यतील सेलू येथील जिजामाता मिरची प्रक्रिया पणन सहकारी
संस्था, औसा येथील औसा तालुका सहकारी खरेदी विक्री –विक्री संघ, रेणापूर रेणुका शेतकरी
सहाकरी खरेदी –विक्री संघ, चाकूर येथील चाकूर तालुका सहकारी खरेदी –विक्री संघ, चाकूर
तालुक्यातील आष्टा येथील शेषाद्री कृषी वस्तू पुरवठा सहकारी संस्था, उदगीर येथील स्व. रावचंद्रराव पाटील तळेगावकर
तालुका सहकारी खरेदी –विक्री संघ, देवणी येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, अहमदपूर
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, निलंगा तालुक्यातील हालसी (तु) येथील विविध
कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, उदगीर तालुक्यातील लोणी येथील रंगराव पाटील कृषी उत्पन्न
(खाजगी) बाजार समिती, अहमदपूर तालुक्यातील साताळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी
सोसायटी, शिरुर ताजबंद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसयटी, जळकोट तालुक्यातील
कुणकी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसयटी या खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात
आली आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत
दरानुसार मूग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभा घ्यावा. शेतकऱ्यांनी गावाजवळील नाफेड
खरेदी केंद्रावर जावून सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या
पिकाची नोंदणी करुन घ्यावी. एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर
घेवून यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष
दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, रोहीत दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक
श्रीधर बी. डुबे-पाटील व सर व्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment