राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत २४ बालकांवर होणार हृद्यरोग विषयक उपचार
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत २४ बालकांवर होणार हृद्यरोग विषयक उपचार • जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पालकांशी संवाद • पुणे येथील विविध रुग्णालयांमध्ये होणार उपचार लातूर, दि. १० : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शासकीय, निमशासकीय शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हृद्यदोष आढळलेल्या २४ बालकांवर पुणे येथील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून यासाठी ही बालके रवाना झाली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या पालकांशी संवाद साधला. आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून दोन वेळा आणि ६ ते १८ ...