Posts

Showing posts from January, 2017
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले यांच्या हस्ते ध्वजारोहण           लातूर, दि. 26 :   भारतीय प्रजास्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तर अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.         यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.) अनंत गव्हाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भाऊसाहेब जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांच्यासह महसूल व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी- कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Image
संविधानामुळे भारतीय लोकशाहीला जगात श्रेष्ठ मानले जाते                                                                          -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर           लातूर, दि. 26 :   26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारल्या पासून भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर आले. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय  राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमोल योगदान लाभले व त्यामुळेच प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या भारतीय लोकशाहीला जगात आज श्रेष्ठ मानले जाते, असे प्रतिपादन कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री  श्री. संभाजी  पाटील-निलंगेकर यांनी केले.            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुलाच्या प्रागंणात  मुख्य शासकीय ध्वजारोहण आज सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, पोलीस अध
Image
भारतीय लोकशाहीच्या बळकटकीकरणासाठी  सुज्ञ मतदार आवश्यक                                                                    -जिल्हाधिकारी पांडुरंग  पोले         लातूर,दि.25: राष्ट्रीय मतदार दिवसाच्या माध्यामातून भावी मतदार असलेल्या तरूण पिढीला मतदार बनवून  मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्याचे उदिष्ट आहे. व हाच सुज्ञ भावी मतदार भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक  असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी पांडूरंग पोले यांनी केले.             येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीसीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी  पोले बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी  रामेश्वर रोडगे, जर्नाधन विधाते,तहसिलदार संजय वारकड, अहिल्या गाठाळ, पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य अरविंद सिंग, काकशिट महाविद्यालयाचे प्राचार्य एन.सी. झुल्पे, लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कुंभार, मतदार जागृती अभियानाचे समन्वयक श्री.नितनवरे, नायब तहसिलदार पी.डी. जाधव यांच्यासह नव मतदार, महा
Image
लातूर जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे 2018 पर्यंत पूर्ण करणार                                -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर           लातूर, दि. 4 :   प्रत्येक गाव, शहर, जिल्हा व पर्यायाने देशाचा विकास हा तेथील चांगल्या व दर्जेदार दळणवळणाच्या सुविधांमुळे अधिक गतीने होत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करुन लातूर जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अधिक गतीमान करण्यात येणार असून सन 2018 पर्यंत जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.           निलंगा तालुक्यातील बोरसुरी, तगरखेडा व होसूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन तसेच होसूर निम्न पातळी बंधा-याचे जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमास खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभि
Image
सर्व व्यापा-यांनी आर्थिक व्यवहार कॅशलेस पध्दतीने करावेत                            खासदार डॉ. सुनील गायकवाड           लातूर, दि. 3 :   जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी आपआपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार हे कॅशलेसच्या विविध पध्दतीचा अवलंब करुन पुर्ण करावेत, असे आवाहन लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केले.             येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित व्यापारी व बँक अधिका-यांच्या कॅशलेस व्यवहाराबाबतच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्री.  गायकवाड बोलत होते. यावेळी मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष गील्डा, सराफा असोसिएशन चे अध्यक्ष मोहन जाधव, उद्योजक शिवकुमार गवळी, गोविंद पारीक, रमेश सोनवणे, सुधीर जाधव व  सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते.             खासदार गायकवाड पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने अर्थव्यवस्थेत कॅशलेसचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कॅशलेस व्यवहार पध्दतीचा लातूर जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने ही स्विकार
Image
सर्व यंत्रणांनी जलयुक्तमधील कामांची अद्यावत माहिती द्यावी                                                             -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले लातूर दि . 2 :जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पावसाळा संपल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू केलेल्या विविध कामांची  माहिती अद्यावत करून त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल नियमीतपणे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी  पोले बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा  नियोजन अधिकारी एस.बी कोलगणे, एलएमआयाचे कार्यकारी अभियंता के. यु. पाटील, लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक -2 च्या कार्यकारी अभियंता आर.डी. ठोंबरे, निम्न तेरणा प्रकल्पचे कार्यकारी अभियंता ई. एम. चिस्ती, वरिष्ठ भुवैज्ञानिक एस.बी. गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी पोले म्हणाले की सन 2015-16  व सन 2016-17 जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अपूर्ण राहिलेली व सुरू न झालेली कामे यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर मोठय