सर्व यंत्रणांनी जलयुक्तमधील कामांची अद्यावत माहिती द्यावी
                                                            -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले


लातूर दि. 2 :जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पावसाळा संपल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू केलेल्या विविध कामांची  माहिती अद्यावत करून त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल नियमीतपणे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी  पोले बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा  नियोजन अधिकारी एस.बी कोलगणे, एलएमआयाचे कार्यकारी अभियंता के. यु. पाटील, लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक -2 च्या कार्यकारी अभियंता आर.डी. ठोंबरे, निम्न तेरणा प्रकल्पचे कार्यकारी अभियंता ई. एम. चिस्ती, वरिष्ठ भुवैज्ञानिक एस.बी. गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पोले म्हणाले की सन 2015-16  व सन 2016-17 जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अपूर्ण राहिलेली व सुरू न झालेली कामे यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर मोठया प्रमाणावर सुरू होणे आवश्यक होते. त्याकरिता संबंधीत विभाग प्रमुखांनी अपूर्ण कामे त्वरीत सुरू करण्याबाबत दक्षता घ्यावी,असे त्यांनी सांगितले.
तसेच सर्व यंत्रणांना आतापर्यंत  पूर्ण केलेल्या सर्व कामांची अदयावत माहिती सिमनिक प्रणालीवर तात्काळ अपलोड करावी. तर कामे सुरू होण्यापुर्वी  जागेची छायाचित्रे, सुरू झाल्यानंतरची छायाचित्रे व कामे पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे MRASC प्रणालीवर जाऊन अपडेट करावीत, असे निर्देश श्री. पोले यांनी दिले जर MRASC  प्रणालीस छायाचित्रे काही तांत्रिक कारणांमुळे अपडेट होत नसतील तर प्रशासनाला तसा अहवाल छायाचित्रासह पाठवावे, असे त्यांनी सांगितले
कृषि विभागाने अपूर्ण राहिलेली कामे मोठया प्रमाणावर सुरू होतील याबाबत काळजी घेण्याची सुचना जिल्हाधिकारी पोले यांनी  केली ज्या गुत्तेदारांना कामे दिलेली आहेत त्यांच्याकडून योग्य प्रकारे व वेळेत कामे पुर्ण करून घेण्याची जाबाबदारी संबंधित यंत्रणेची असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी जिल्हाधिकारी पोले यांनी कृषि विभाग,लघुपाटबंधारे विभाग, जलसंधारण स्थानिक स्तर, जिल्हा परिषदेच्या यंत्रणा, निम्न तेरणा प्रकल्प आदि विभागाने पावसाळयानंतर सुरू केलेल्या कामांचा आढावा घेऊन सदरील कामे मोठया प्रमाणावर सुरू करण्याबाबत निर्देश दिले.

.****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु