मतदार जागृतीचा….. सेल्फी पॉईंट

    लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून या निवडणूकीसाठी  एकुण 2 लाख 77  हजार 775 मतदार मतदान करणार आहेत.
           त्यामुळे प्रशासनाकडून दिनांक 19 एप्रिल 2017 रोजीच्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवून लोकशाही प्रणाली  बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे.
            राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडूरंग  पोले यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त रमेश पवार व प्रशासन मतदार जनजागृतीसाठी मोहिम राबवित असून या मोहिमेस  मतदारांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
              होय, मी मतदान करणारच,  तुम्ही पण मतदान करा, व  सेल्फी पॉईंट--- या मथळ्यांनी शहराच्या चौका चौकातील होर्डींग नागरिकांचे  लक्ष वेधून घेत आहेत.  तसेच महापालिका प्रशासनाने लातूर शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, व विवेकानंद चौकात मतदार जागृतीसाठी सेल्फी पॉईंट उभारले आहेत. या ठिकाणी मतदारांनी येऊन मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढायचा व  महापालिकेच्या 9011032210 व 9168640631 च्या व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवायचा व 19 एप्रिल 2017 रोजी मतदान करणारच असे याद्वारे सांगावयाचं आहे.
              या सेल्फी पॉईटं मोहिमेला शहरातील नागरिकाडून उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे.  तसे पाहिले असता आजच्या स्मार्ट फोनच्या काळातील तरूणाईला सेल्फी घेण्याची  आवड आपण सर्वजण जाणतोच.  यातून  महापालिकेने अशा तरूण मतदारांना सेल्फी पॉईंट उपलब्ध करून देण्याबरोबरच मतदार जागृती करण्याचे महत्वाचे काम केले आहे व हि एक अनोखी कल्पना  असून तरूण मतदारांमध्ये प्रभावी ठरत असल्याचं प्राथमिक चित्र दिसत आहे.
             या निवडणूकीमध्ये शहरातील सुमारे 28 हजार मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. त्यामुळे या सर्व नव मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे म्हणून प्रशासनाने केलेली सेल्फी पॉईटं मोहिम सर्वाचे लख वेधून  तर घेतच आहे,  पण हा नवमतदार ही उत्साहाने सेल्फी काढून महापालिकेच्या व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवून आपण बुधवार दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान करणारच याबाबत अश्वासित करत असून सुदृढ लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होत असल्याचे चित्र सध्या लातूर शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
            एकंदरीतच प्रशासनाच्या मतदान जनजागृती मोहिमेमुळे लातूर शहरातील जास्तीत जास्त मतदार  आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढुन  दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी  मतदानाचा हक्क बजावणार याबाबत मला खात्री तर आहेच पण एकुण मतदानाच्या प्रक्रियेत तरूण मतदार मोठया प्रमाणावर आपला मतदानाचा हक्क बजावून एक प्रकारे आपलं कर्तव्य ही पार पाडतील  या विषयी ही  शंभर  टक्के खात्री मला वाटत आहे.
                                                                                 
                                                                                      (सुनिल सोनटक्के)
                                                                                                                        जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                                                   लातूर


*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा