विशेष लेख : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’
राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि मुत्सद्दी दृष्टिकोनाने भारताच्या अखंडतेचा पाया रचला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुजरातमध्ये उभारलेला १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आज जगातील सर्वाधिक उंच पुतळा असून, २०२४-२५ या वर्षात तब्बल ६०.५९ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मो...