मराठी ग्रंथांच्या शासनमान्य यादीसाठी प्रकाशकांना आवाहन
मराठी ग्रंथांच्या शासनमान्य यादीसाठी प्रकाशकांना आवाहन
लातूर, दि. 01 : राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मराठी भाषेत प्रकाशित ग्रंथांची माहिती आणि खरेदीसाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या शिफारशींनुसार दरवर्षी शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित केली जाते. यासाठी 2024 या कॅलेंडर वर्षात (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) प्रकाशित झालेल्या आणि प्रथम आवृत्ती असलेल्या मराठी ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई - 400 001 यांच्याकडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठवावी, असे आवाहन ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्यचे प्र. ग्रंथालय संचालक तथा राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
यापूर्वी संचालनालयास पाठविलेल्या ग्रंथांची पुन्हा प्रत पाठवण्याची आवश्यकता नाही. हे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, असे श्री. गाडेकर यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment