दीपावली सणानिमित्त 21 व 23 ऑक्टोबर रोजी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडी राहणार बंद
दीपावली सणानिमित्त 21 व 23 ऑक्टोबर रोजी
विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडी राहणार बंद
लातूर, दि. 14 (जिमाका): दिपावली सणानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दीपावली सणानिमित्त मंगळवार, 21 ऑक्टोबर आणि गुरुवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी बंद राहील. तसेच सोमवार, 20 ऑक्टोबर आणि बुधवार, 22 ऑक्टोबर 2025 रोजी ओपीडी सुरु राहील. रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहणार आहे. शुक्रवार, 24 ऑक्टोबर, 2025 रोजी पासून बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment