माजी सैनिक, शहीद परिवार आणि अवलंबितांसाठी लातूर येथे मार्गदर्शन शिबिर

माजी सैनिक, शहीद परिवार आणि अवलंबितांसाठी लातूर येथे मार्गदर्शन शिबिर लातूर, दि. 16 : जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद परिवार, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांना केंद्र आणि राज्य सैनिक कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लातूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिला बचत गटांमार्फत 15 लाखांपर्यंत आणि स्वयंरोजगाराद्वारे 6 लाखांपर्यंत अनुदानाच्या योजनांची माहिती देऊन सैनिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. हे मार्गदर्शन शिबिर 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन