रब्बी हंगामासाठी चारा बियाणे वाटप योजनेकरिता 28 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

रब्बी हंगामासाठी चारा बियाणे वाटप योजनेकरिता 28 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 15 : सन 2025-26 या आर्थिक वर्षात रब्बी हंगामासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सुधारित संकरित चारा बियाणे 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्यांमधून पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पशुपालाकांनी www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्म लिंकच्या मदतीने 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जदाराकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत किमान 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक असून चारा उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन आणि सिंचन सुविधा असावी. सर्व प्रवर्गातील पशुपालकांना या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थी निवड पात्र अर्जांमधून सोडत पद्धतीने होईल. लातूर जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील पशुपालकांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन