जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते स्वस्त दराने तूरदाळ विक्री केंद्राचा शुभारंभ 110 रु. प्रति किलो दराने तूरदाळ विक्री, शहरात चार विक्री केंद्र लातूर, दि.30: लातूर जिल्ह्याची ओळख असलेली उच्च प्रतीची तूरदाळ ग्राहकांना माफक दरात मिळावी याकरिता जिल्हा प्रशासन व लातूर दाळ मील असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केट यार्ड येथे तूरदाळ विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते ग्राहकांना 110 रु. प्रति किलो दराने तूरदाळ देऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड, लातूर दाळ मील असोसिएशनचे अध्यक्ष हकीमचंद कलंत्री, लातूर जिल्हा किराणा होलसेल व्यापारी संघाचे अध्यक्ष बसवराज बळसंगे, दाळ मील असोसिएशनचे सचिव विनोद अग्रवाल आदीसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पोले यांच्या हस्ते ए.के.ॲग्रो सर्व्हि...
Posts
Showing posts from July, 2016
- Get link
- X
- Other Apps
मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे यांच्याकडून जलदुतच्या 101 व्या फेरीचे स्वागत लातूर, दि.30: मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या परिस्थितीवर उपाय योजना म्हणून मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक 12 एप्रिल 2016 पासून लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा सुरु झाला. आज दिनांक 30 जुलै 2016 रोजी सकाळी जलदुत या रेल्वेची 101 वी फेरी लातूर रेल्वे स्थानकात आल्यानंतर सोलापूर विभागाचे मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे या जलदुतचे स्वागत केले. यावेळी विभागीय वाणीज्य प्रबंधक अशोक उपाध्याय, रेल्वे अभियंता रविंद्र सिंग, मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागर समितीचे सदस्य शिवाजीराव नरहरे, निजाम शेख, रेल्वे सोलापूर चे ए.ओ.एम. शिवराज मानसपुरे, ॲड. व्ही. व्ही. उगले आदिसह सर्व समिती सदस्य व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. जलदुतच्या 101 व्या फेरीचे समारंभपुर्वक स्वागत करुन श्री. दुबे म्हणाले की, लातूर शहराला पाणी पुरवठा करणा-या धरण क्षेत्राच्या परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऑगस्ट 2016 अ...
- Get link
- X
- Other Apps
जलदूतच्या 100 फे-यामधून लातूर शहराला 23 कोटी 20 लाख लीटर पाणी पुरवठा लातूर, दि.29 : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईची परिस्थीती लक्षात घेवुन तातडीचा उपाय म्हणुन सुरु केलेल्या जलदुत या पाण्याच्या रेल्वेने 100 वी फेरी आज दिनांक 29 जुलै 2016 रोजी पुर्ण केली. आजपर्यंत लातूर शहरासाठी रेल्वेने एकूण 23 कोटी 20 लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात आला आहे. मागील चार महिन्यापासून शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मिरज येथून 10 टँकरने 5 लाख लिटर पाणी घेवून येणाऱ्या पहिल्या रेल्वेचे आगमन लातूर शहरात दि. 12 एप्रिल रोजी झाले होते. लातूर शहरासाठी दि. 20...
- Get link
- X
- Other Apps
लातूर जिल्ह्यात 5 हजार विंधन विहिरींचे जलपुन:र्भरण लातूर जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सातत्याने पाऊस कमी प्रमाणात झाल्याने भीषण टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली होती. या टंचाईच्या परिस्थितीवर सक्षमपणे मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणुन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर महानगरपालीका सह औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर नगरपालीकांच्या कार्यक्षेत्रात जलपुन:र्भरण अभियान 2016 ची प्रभावी अंमलबजावणी करुन पाच हजार पेक्षा अधिक बोअरवलचे जलपुन:र्भरण करण्यात आलेले आहे व यावर्षीच्या पावसामुळे यातील सर्व बोअरवेल रिचार्ज होऊन पाणी आलेले आहे. टंचाई परिस्थिती : जिल्ह्यात सततच्या कमी पर्जन्यामुळे पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झालेली होती जिल्ह्याच्या जल पातळीत जवळपास साडेतीन मीटर घट झालेली होती. त्यामुळे परिस्थितीचा वेळीच अंदाज घेऊन प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. अर्धशासकीय पत्र (डी....
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय पिक विमा योजनेचे हप्ते 31 जुलै पर्यंत बॅंकेत भरण्याचे आवाहन लातूर, दि.18:- राष्ट्रीय पिक विमा योजना सन 2016-17 अंतर्गत लातूर विभागाच्या सर्व जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मुग, तूर, भुईमुग, कारळ, तीळ, सोयाबीन, सुर्यफुल, कापूस व कांदा या पिकासाठी विमा रक्कमेचा भरणा 31 जुलै 2016 पर्यंत बॅंकेमध्ये करण्याचे अवाहन विभागीय कृषि सहसंचालक, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रान्वये केले आहे. राष्ट्रीय पिक विमा योजनेचे विमा हप्ते भरणे, विमा संरक्षित रक्कम, पिके इतर माहितीबाबत शेतक-यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ,राष्ट्रीयकृत बॅंक अथवा ग्रामस्तरावर कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषि विभागामार्फत कळविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांनी पिक नुकसानीची घटना झाल्यापासून 48 तासांच्या आत याची ...
- Get link
- X
- Other Apps
डाळिंब फळपिकांचा विमा 14 जुलै पर्यंत भरावा लातूर दि. 11:- जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2016-17 करीता (मृगबहार) मध्ये अधिसुचित फळपिकाबरोबरच डाळिंब या फळपिकांना लागु करण्यात आलेली आहे. सदरील योजनेअंतर्गत मुळ हवामान धोक्यापासुन व गारपिट हवामान धोक्यापासुन विमा संरक्षण या घटकाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. डाळिंब, फळपिक विमा हाप्ता भरण्याची अंतिम मुदत दिनांक 14 जुलै 2016 आहे. सदर विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक स्वरुपाची असेल. अधिक माहितीसाठी फळपिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांनी मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी या कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आव्हान जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे. विमा संरक्षित रक्कम व हप्ता पुढील प्रमाणे :- डाळिंब या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,10,000/-(एक लाख दहा हजार रुपये) ,विमा हप्ता दर 5 ट...