लातूर जिल्ह्यात 5 हजार विंधन विहिरींचे जलपुन:र्भरण




            लातूर जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सातत्याने पाऊस कमी प्रमाणात झाल्याने भीषण टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली होती. या टंचाईच्या परिस्थितीवर सक्षमपणे मात करण्यासाठी  जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणुन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर महानगरपालीका सह औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर नगरपालीकांच्या कार्यक्षेत्रात जलपुन:र्भरण अभियान 2016  ची प्रभावी अंमलबजावणी करुन पाच हजार पेक्षा अधिक बोअरवलचे जलपुन:र्भरण करण्यात आलेले आहे व यावर्षीच्या पावसामुळे यातील सर्व बोअरवेल रिचार्ज होऊन पाणी आलेले आहे.
टंचाई परिस्थिती :
            जिल्ह्यात सततच्या कमी पर्जन्यामुळे पाणी  टंचाईची  भीषण परिस्थिती निर्माण झालेली होती जिल्ह्याच्या जल पातळीत जवळपास साडेतीन मीटर घट झालेली होती.  त्यामुळे परिस्थितीचा वेळीच अंदाज घेऊन प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
अर्धशासकीय पत्र (डी.ओ. लेटर) :
             जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जलपुन:र्भरण अभियानात नागरिकांनी उत्सुर्फत सहभाग घेऊन आपल्याकडील बोअरवेलचे जलपुन:र्भरण करावे याकरिता लातूर महानगरपालीका , औसा, उदगीर, निलंगा व अहमदपूर नगरपालीका मधील नागरीक,  शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकूले, अपार्टमेंट, रुग्णालये आदीसह 11 हजार 200 मालमत्ता धारकांना अर्धशासकीय पत्रे दिली. याद्वारे नागरिकांनी आपले बोअरवेल रिचार्ज करुन घेऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य देण्याचे आवाहन केले होते.

जलपुन:र्भरणाबाबत कार्यशाळा :
 प्रशासनाने जलपुन:र्भरण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता शासकीय व निमशासकीय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची कार्यशाळा घेऊन जलपुर्नभरणाची मोहीम संबंधित विभागांनी त्यांच्या स्तरावर राबवावी असे आवाहन करण्यात आले होते,  याचाच परिणाम म्हणून 5 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी बोअरवेलचं पुर्नभरण केले आहे व यावर्षीच्या पावसाच्या सुरुवातीलाच या बोअरांना पाणी आल्याने  या अभियान यश मिळाले आहे.
मालमत्ता करात 5% सूट :
           लातूरकर पाण्याच्या भीषण टंचाईस सामोरे जात असतांना आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्या इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी एकत्रीत करुन व सांडपाणी अडवून ते जमीनीमध्ये मुरविण्यासाठी जलपुन:र्भरण करणे ही काळाची गरज आहे,  याकरिता प्रोत्साहन म्हणून नगर विकास विभाग यांच्या दिनांक 4 जानेवारी 2011 च्या आदेशान्वये प्रस्तुत मालमत्ता करामध्ये 5 टक्के सुट देण्याचे निश्चीत केलेले आहे.

लातूर शहर महानगरपालिका :
           लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात जलपुन:र्भरण अभियान कार्यक्षमपणे राबविण्यासाठी 35 प्रभागामध्ये महापालीकेने 35 पालक अधिकारी नियुक्त केले.  शहराच्या चारही झोन करिता चार क्षेत्रीय अधिका-यांची नियुक्ती करुन या सर्वांवर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सनियंत्रण ठेवून लातूर शहरात सदरची मोहिम यशस्वी राबविली आहे.

5 हजार बोअरवेलचं पुर्नभरण :
           या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी व संस्थांनी सहभाग घेऊन 5 हजारपेक्षा अधिक बोअरवेलचं पुर्नभरण केलेले आहे परतु जलपुन:र्भरण केल्यानंतर महापालिका व नगरपालिका यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक होते. सद्यस्थितीमध्ये फक्त 2 हजार 550 नागरिकांनीच जलपुन:र्भरणाच्या नोंद केल्या आहेत या सर्व नागरिकांना जलपुन:र्भरण मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल  जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.
 5 हजार बोअर झाले रिचार्ज :
           1 जून 2016 ते 27 जुलै 2016 पर्यंत लातूर जिल्ह्यात एकूण 337.61 मि.मी. पावसाची नोंद झालेली असून वार्षीक सरासरीच्या  42.09 टक्के पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे भीषण टंचाईच्या काळात बंद पडलेल्या विंधन विहिरी जलपुन:र्भरणामुळे रिचार्ज होऊन जवळपास सर्व विंधन विहिरींना पाणी येण्यास सुरुवात झाली असल्याने प्रशासनावरील ताण कमी झालेला आहे. व हे जलपुन:र्भरण अभियान 2016 चे यश आहे.

                                                                                  
                                                                                              संकलन :  जिल्हा माहिती  कार्यालय
                                                                                                                        लातूर































































Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु