डाळिंब फळपिकांचा विमा 14 जुलै पर्यंत भरावा
लातूर दि. 11:- जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुर्नरचित
हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2016-17 करीता (मृगबहार) मध्ये अधिसुचित फळपिकाबरोबरच
डाळिंब या फळपिकांना लागु करण्यात आलेली आहे. सदरील योजनेअंतर्गत मुळ हवामान धोक्यापासुन
व गारपिट हवामान धोक्यापासुन विमा संरक्षण या घटकाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
डाळिंब, फळपिक विमा हाप्ता भरण्याची अंतिम
मुदत दिनांक 14 जुलै 2016 आहे. सदर विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर
कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक स्वरुपाची असेल. अधिक माहितीसाठी फळपिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांनी
मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी या कार्यालयाकडे संपर्क
साधावा. असे आव्हान जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.
विमा संरक्षित रक्कम व हप्ता पुढील
प्रमाणे :-
डाळिंब
या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,10,000/-(एक लाख दहा हजार रुपये) ,विमा हप्ता
दर 5 टक्के तर विमा हप्ता रक्कम 5,500/-(पाच हजार पाचशे रुपये) आहे. डाळिंब फळपिकासाठी
समाविष्ट धोके 1) कमी पाऊस (फळधारणेची अवस्था) यासाठी विमा संरक्षण कालावधी हा 15 जुलै
2016 ते 15 ऑगस्ट 2016 2) कमी पाऊस (फळ धारणेची
अवस्था) 16 ऑगस्ट 2016 ते15 ऑक्टोबर 2016. 3) कमी पाऊस (फळ धारणेची अवस्था) 16 ऑक्टोबर
2016 ते 30 डिसेंबर 2016 राहील.
सदर योजना इफ्फको टोकीयो जनरल इन्शुरन्स
कंपनी, गुरगाव हरियाणा-1यांच्याकडून कार्यान्वीत करण्यात येणार आहे. योजनेसाठी महसुल
मंडळ क्षेत्र घटक धरून राबविण्यात येणार आहे. सदर विमा योजनेचा शेतकऱ्यांनी जवळच्या
प्राधिकृत राष्ट्रीय व सहकारी बँकेमध्ये हप्ता भरावा. सदरील प्रस्तावासोबत 7/12 उतारा
आवश्यक आहे असे प्रसिध्द पत्रात नमुद केले आहे.
डाळिंब फळपिक विमा योजनेत समाविष्ट नावे तालुका
निहाय पुढील प्रमाणे:-
रेणापूर – कारेपूर महसुल मंडळ, औसा
- औसा, लामजना, किन्नीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा महसुल मंडळ, उदगीर – नागलगाव, हेर महसुल मंडळ, चाकूर
– नळेगाव, चाकूर, वडवळ नागनाथ महसुल मंडळ,
निलंगा – निलंगा, औराद(शा) महसुल
मंडळ, अहमदपुर- किनगाव महसुल मंडळ.
*****
Comments
Post a Comment