मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे यांच्याकडून
जलदुतच्या 101 व्या फेरीचे स्वागत


        लातूर, दि.30: मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या परिस्थितीवर उपाय योजना म्हणून मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक 12 एप्रिल 2016 पासून लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा सुरु झाला. आज दिनांक 30 जुलै 2016 रोजी सकाळी जलदुत या रेल्वेची 101 वी फेरी लातूर रेल्वे स्थानकात आल्यानंतर सोलापूर विभागाचे मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे या जलदुतचे स्वागत केले.
यावेळी  विभागीय वाणीज्य प्रबंधक अशोक उपाध्याय, रेल्वे अभियंता रविंद्र सिंग, मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागर समितीचे सदस्य शिवाजीराव नरहरे, निजाम शेख, रेल्वे सोलापूर चे ए.ओ.एम. शिवराज मानसपुरे, ॲड. व्ही. व्ही. उगले आदिसह सर्व समिती सदस्य व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
जलदुतच्या 101 व्या फेरीचे समारंभपुर्वक स्वागत करुन श्री. दुबे म्हणाले की, लातूर शहराला पाणी पुरवठा करणा-या  धरण क्षेत्राच्या परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऑगस्ट 2016 अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरवठा केला जाईल. रेल्वे द्वारे लातूर स्थानकात पाणी आल्यानंतर जिल्हा प्रशासन व महानगर पालीका प्रशासनाने शहरवासियांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी  करत असलेल्या पाणी वितरण व्यवस्थेची प्रशंसा केली. जलदुतच्या 101 व्या फेरीअखेर लातूर शहराला एकूण 23 कोटी 45 लाख लीटर पाणी पुरवठा करण्यात अलेला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. शेखर हविले यांनी केले तर आभार संजय निलेगावकर यांनी मानले.


  पुस्तिकेचे विमोचन :
         मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामार्फत जलदुत   रेल्वेवर आधारित तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे  विमोचन मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे व      मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा