जलदूतच्या 100 फे-यामधून लातूर शहराला
23 कोटी 20 लाख लीटर पाणी पुरवठा
लातूर, दि.29 : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईची परिस्थीती लक्षात घेवुन तातडीचा उपाय म्हणुन
सुरु केलेल्या जलदुत या पाण्याच्या रेल्वेने 100 वी फेरी आज दिनांक 29 जुलै 2016 रोजी
पुर्ण केली. आजपर्यंत लातूर शहरासाठी रेल्वेने
एकूण 23 कोटी 20 लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
मागील
चार महिन्यापासून शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा
करण्यात येत आहे. मिरज येथून 10 टँकरने 5 लाख
लिटर पाणी घेवून येणाऱ्या पहिल्या रेल्वेचे आगमन लातूर शहरात दि. 12 एप्रिल रोजी झाले
होते. लातूर शहरासाठी दि. 20 एप्रिल पासून
50 वॅगनद्वारे 25 लाख लिटर पाणी आणले जात असून 50 वॅगनद्वारे रेल्वेच्या आजवरच्या 91
फेऱ्यांमधून सुमारे 22 कोटी 75 लाख लिटर पाणी
आणण्यात आले. 5 लाख लिटरच्या 9 आणि 25 लाख लिटर पाण्याच्या आजवरच्या 91 फेऱ्यांद्वारे
आजपर्यंत एकूण जलदुतच्या 100 फे-यामध्ये एकूण
23 कोटी 20 लाख लिटर पाणी लातूर शहरासाठी आणण्यात आले. यामुळे
लातूर शहराला भीषण टंचाईच्या काळात नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांना
दिलासा मिळाला.
*****
Comments
Post a Comment