राष्ट्रीय पिक विमा योजनेचे हप्ते 31 जुलै पर्यंत
बॅंकेत भरण्याचे आवाहन
        लातूर, दि.18:- राष्ट्रीय पिक विमा योजना सन 2016-17 अंतर्गत लातूर विभागाच्या सर्व जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मुग, तूर, भुईमुग, कारळ, तीळ, सोयाबीन, सुर्यफुल, कापूस व कांदा या पिकासाठी विमा रक्कमेचा भरणा 31 जुलै 2016 पर्यंत बॅंकेमध्ये करण्याचे अवाहन विभागीय कृषि सहसंचालक, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रान्वये केले आहे.
          राष्ट्रीय पिक विमा योजनेचे विमा हप्ते भरणे, विमा संरक्षित रक्कम, पिके इतर माहितीबाबत शेतक-यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ,राष्ट्रीयकृत बॅंक अथवा ग्रामस्तरावर कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषि विभागामार्फत कळविण्यात येत आहे.
         या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांनी पिक नुकसानीची घटना झाल्यापासून 48 तासांच्या आत याची सुचना विमा कंपनी, कृषि/महसूल विभाग अथवा टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.
          पिकाचे नाव, प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाच्या पीक विमा हप्ता पुढील प्रमाणे-
1)भात ( विमा संरक्षित रक्कम 39,000/-, हप्ता-780/-), 2) खरीप ज्वारी  (विमा संरक्षित रक्कम 24,000/-, हप्ता-480/-), 3) बाजरी ( विमा संरक्षित रक्कम 20,000/-, हप्ता-400/-), 4) नाचणी (विमा संरक्षित रक्कम 20,000/-, हप्ता-400/-), 5)मका (विमा संरक्षित रक्कम 25,000/-, हप्ता-500/-), 6) तुर (विमा संरक्षित रक्कम 28,000/-, हप्ता-560/-),7) मुग (विमा संरक्षित रक्कम 18,000/-, हप्ता-360/-),8) उडीद (विमा संरक्षित रक्कम 18,000/-, हप्ता-360/-), 9) भुईमुग (विमा संरक्षित रक्कम 30,000/-, हप्ता-600/-),10) सोयाबीन (विमा संरक्षित रक्कम 36,000/-, हप्ता-720/-),11) सुर्यफुल (विमा संरक्षित रक्कम 22,000/-, हप्ता-440/-),12) तीळ (विमा संरक्षित रक्कम 22,000/-, हप्ता-440/-),13) कारळे (विमा संरक्षित रक्कम 20,000/-, हप्ता-400/-), 14) कापूस (विमा संरक्षित रक्कम 36,000/-, हप्ता-1800/-), 15) कांदा (विमा संरक्षित रक्कम 50,000/-, हप्ता-2500/-).

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा