जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते स्वस्त दराने
तूरदाळ विक्री केंद्राचा शुभारंभ
110 रु. प्रति किलो दराने तूरदाळ विक्री, शहरात चार विक्री
केंद्र
लातूर, दि.30: लातूर
जिल्ह्याची ओळख असलेली उच्च प्रतीची तूरदाळ ग्राहकांना माफक दरात मिळावी याकरिता जिल्हा
प्रशासन व लातूर दाळ मील असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केट यार्ड येथे तूरदाळ
विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते ग्राहकांना
110 रु. प्रति किलो दराने तूरदाळ देऊन करण्यात आला.
यावेळी
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड,
लातूर दाळ मील असोसिएशनचे अध्यक्ष हकीमचंद कलंत्री, लातूर जिल्हा किराणा होलसेल व्यापारी
संघाचे अध्यक्ष बसवराज बळसंगे, दाळ मील असोसिएशनचे सचिव विनोद अग्रवाल आदीसह ग्राहक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
पोले यांच्या हस्ते ए.के.ॲग्रो सर्व्हिसेस येथील तूरदाळ विक्री केंद्रावर 10 ग्राहकांना
प्रातिनिधीक स्वरुपात फक्त 110 रुपये प्रति किलो दराने तूरदाळीची विक्री करुन स्वस्त
दराने तूरदाळ विक्री केद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पोले म्हणाले की,विक्री
केंद्रावर प्रति किलो 110 रुपयापेक्षा अधिक दराने तूरदाळाची विक्री होणार नाही याबाबत
दक्षता घ्यावी. तसेच ग्राहकांच्या फायद्याकरिता यापेक्षा कमी दराने ही दाळ विक्री करता
यावी म्हणून दाळ मील असोसिएशनने प्रयत्न करण्याची सुचना त्यांनी केली.
दाळ विक्री
केंद्रावर दाळविक्रींचे रेकॉर्ड ठेवून दाळ विक्रीचा गैरवापर होणार नाही याबाबत व्यापा-यांनी
दक्षता घेण्याची सुचना श्री. पोले यांनी केली. लातूर शहरात चार ठिकाणी स्वस्त दराने
तूरदाळ विक्री केंद्राची सुरुवात झाली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
त्यांनी केले. या केंद्राच्या माध्यमातून व्यापा-यांनी सामाजिक जाणीव जागृत ठेवून ग्राहकांना
लाभ मिळवून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे श्री पोले यांनी सांगितले.
शेतक-यांच्या
मालाला उत्पादनाच्या आधारावर चांगला भाव मिळाला पाहिजे त्याबरोबरच ग्राहकांना ही माफक
दरात अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी व्यापारी वर्गाने महत्वाची भूमिका बजाविण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी पोले यांनी केले.
दाळ मील
असोसिएशनचे अध्यक्ष कलंत्री म्हणाले की, तूरदाळ
विक्री केंद्रावर दिवाळीपर्यंत प्रति किलो 110 रुपये दराने तूरदाळ विक्री केली जाईल
तर बाजार भाव कमी झाल्यास यापेक्षा कमी दराने दाळ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ग्राहकांना
चांगल्या प्रतीची व स्वच्छ तूरदाळ उपलब्ध करण्यासाठी लातूर जिल्हा किराणा होलसेल व्यापारी संघ प्रशासनाला सहकार्य करेल, अशी माहिती
श्री बळसंगे यांनी दिली.
उच्च
प्रतीची तूरदाळ 110 रुपये प्रति किलो :
जिल्हा प्रशासन व लातूर दाळ
मील असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहरात चार ठिकाणी प्रति किलो 110 रुपये
दराने तूरदाळ विक्री केंद्रे सुरु करण्यात आलेली आहेत. यापुर्वी एक ठिकाणी तर आज रोजी
हकिमचंद कलंत्री, संजय बियाणी व आशिष मित्तल या तीन व्यापा-यांनी सुरु केलेल्या विक्रीकेंद्राचे
उद्घाटन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते झाले. तसेच औसा व उदगीर येथे तर
लातूर शहरात कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत स्वस्त दराने तूरदाळ विक्री केंद्राचा
शुभारंभ लवकरच होणार आहे.
*****
Comments
Post a Comment