Posts

Showing posts from November, 2022
    निवृत्तीवेतनधारकांनी बचतीची माहिती 5 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवा ह न   लातूर, दि. 29 (जिमाका) :   जिल्हा कोषागार कार्यालय अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच माजी विधानसभा सदस्य आणि माजी विधानपरिषद सदस्य आदी राजकीय निवृत्तवेतनधारकांनी 2022-23 मधील वार्षिक निवृत्तीवेतन पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, जुन्या किंवा नवीन पद्धतीने विकल्प निवडून लातूर जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. तसेच अशा   निवृत्तीवेतन धारकांनी सन 2022-23 मध्ये केलेल्या बचतीची माहिती योग्य त्या पुराव्यासह व पॅन क्रमांक ,   बँक शाखा व पी.पी.ओ. नंबरसह 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी केले आहे.             बचतीची माहीती 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर न केल्यास नियमानुसार निवृत्तीवेतनातून आयकर कपात करण्यात येणार आहे. अद्याप कोषागार कार्यालयास पॅन क्रमांक सादर न केलेल्या आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांचा आयकर अधिनियम 206 एए नुसार 20 टक्के दराने आयकर कपात करण्यात येईल. तरी   अशा निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहि

‘कोटपा’ कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी औसा येथे 22 जणांकडून दंड वसूल जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाची कारवाई

  ‘कोटपा ’ कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी औसा येथे 22 जणांकडून दंड वसूल जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाची कारवाई   लातूर, दि. 29 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याचे (कोटपा) उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाने औसा येथे 22 जणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत पाच हजार 250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, औसा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने ही कारवाई केली. औसा येथील बसस्थानक, हनुमान चौक, शिवाजी चौक परिसरातील अवैधरित्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि जाहिराती करणारे पानटपरी चालकधारक, तहसील कार्यालय व परिसरात सार्वजनिक ठिकाणी पान, सुपारी, गुटखा खाणे व थुंकणाऱ्यांवर 22 जणांवर पथकाने कोटपा कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई केली. या पथकामध्ये औसा येथील पोलीस निरीक्

‘समता पर्व’ अंतर्गत पत्रकारांची कार्यशाळा उत्साहात शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची - माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे

Image
  ‘समता पर्व’ अंतर्गत पत्रकारांची कार्यशाळा उत्साहात शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची -          माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे लातूर , दि . 29 ( जिमाका ) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या वंचित घटकांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम करतात. सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी या विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक असून यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचे माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांनी आज येथे सांगितले. ‘समता पर्व’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मुळे बोलत होत्या. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कार्यशाळेचे मार्गदर्शक शशिकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे, माशुफ खान, दत्तात्रय परळकर, बाळासाहेब होळीकर, लहूजी शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते. विकासापास

‘महारेशीम अभियान 2023’ अंतर्गत जनजागृती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रेशीम रथाला दाखविली हिरवी झेंडी · गावोगावी जावून देणार रेशीम शेतीची माहिती

Image
                                               ‘महारेशीम अभियान 2023’ अंतर्गत जनजागृती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रेशीम रथाला दाखविली हिरवी झेंडी ·         गावोगावी जावून देणार रेशीम शेतीची माहिती लातूर , दि . 28 ( जिमाका ) : रेशीम शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘महारेशीम अभियान 2023’ अभियान राबविण्यात येत आहे. रेशीम शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाला आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांच्यासह जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. रेशीम शेतीचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची माहिती देण्यासाठी रेशीम रथ गावा-गावांमध्ये जाणार आहे. महारेशीम अभियान अंतर्गत जिल्ह्यात रेशीम शेतीच्या प्रसारासाठी , माहिती देण्याबरोबरच नवीन रेशीम लागवडसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार

संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान गुणगौरव परीक्षा 2022’ उत्साहात

Image
  संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान गुणगौरव परीक्षा 2022’ उत्साहात लातूर, दि. 26 (जिमाका) :   श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व समाजकार्य विभाग, संविधान गुणगौरव समिती आणि समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान गुणगौरव परीक्षा 2022’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 176 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार   यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते ,   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख ,   उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे ,   उपप्राचार्य प्रा. संजय पवार ,   उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव ,   समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दिनेश मौने ,   केंद्रप्रमुख कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले ,   सह केंद्रप्रमुख डॉ. संजय गवई यावेळी उपस्थित होते. संविधान गुणगौरव परीक्षेसाठी 191 विद्यार्थ्यांनी नाव नो

संविधान रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
संविधान रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ·        जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दाखविली हिरवी झेंडी ·        संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम लातूर ,   दि .   26   ( जिमाका ) :   संविधानाविषयी लोकांना माहिती व्हावी, यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान   रॅली’मध्ये विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार ,   जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अनिल शेंदारकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख ,   समाज सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते ,   जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस .टी. नाईकवाडी, बसवेश्वर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर शाळांचे शिक्षकवृंद ,   प्राध्यापक ,   विद्यार्थी यावेळी उपस्थित होते

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा रविवारी लातूर दौरा

  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा रविवारी लातूर दौरा लातूर ,   दि. 26 (जिमाका) :   महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे रविवारी (दि. 27) एक दिवसाच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनला लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. दुपारी चार वाजता सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला भार्गव यांच्या सामाजिक कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी बैठक होईल. सायंकाळी सव्वासात ते रात्री आठ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. रात्री आठ वाजता त्या सोलापूरकडे प्रयाण करतील. *****  

अटल भूजल योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा भूजल संवर्धनासाठी जलसाक्षरतेवर भर द्यावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Image
  अटल भूजल योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा भूजल संवर्धनासाठी जलसाक्षरतेवर भर द्यावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. ·          भूजल पातळीतील वाढीसाठी लोकसहभागातून उपाययोजना ·        सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणण्यासाठी होणार प्रयत्न लातूर ,   दि .   26   ( जिमाका ) :   जलसंकट टाळण्यासाठी अटल भूजल योजना जिल्ह्यात प्रभावीपणे   राबवावी. यामाध्यमातून भूजल संवर्धनसाठी जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासह जलसाक्षरतेवर भर द्यावा ,   अशा सूचना जिल्हाधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अटल भूजल योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समितीचे सहअध्यक्ष अभिनव गोयल ,   राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे जलसंधारण तज्ज्ञ रमेश पेटकर ,   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.   लक्ष्मण देशमुख ,   भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यावेळी