‘महारेशीम अभियान 2023’ अंतर्गत जनजागृती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रेशीम रथाला दाखविली हिरवी झेंडी · गावोगावी जावून देणार रेशीम शेतीची माहिती

                                              ‘महारेशीम अभियान 2023’ अंतर्गत जनजागृती

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी

रेशीम रथाला दाखविली हिरवी झेंडी

·        गावोगावी जावून देणार रेशीम शेतीची माहिती


लातूर
, दि. 28 (जिमाका) : रेशीम शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘महारेशीम अभियान 2023’ अभियान राबविण्यात येत आहे. रेशीम शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाला आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी हिरवी झेंडी दाखविली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांच्यासह जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

रेशीम शेतीचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची माहिती देण्यासाठी रेशीम रथ गावा-गावांमध्ये जाणार आहे. महारेशीम अभियान अंतर्गत जिल्ह्यात रेशीम शेतीच्या प्रसारासाठी, माहिती देण्याबरोबरच नवीन रेशीम लागवडसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर व जीवनमान उंचावण्यास रेशीम शेतीमुळे मदत होणार आहे. महारेशीम अभियानातून शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी परिपूर्ण माहिती देवून त्यांना प्रोत्साहित करावे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गतही रेशीम लागवड करता येते. याबाबतची माहितीही प्रकल्पात समाविष्ट गावांमध्ये द्यावी, असे पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.

रेशीम शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी रेशीम रथ ग्रामीण भागामध्ये फिरविण्यात येणार आहे. या दरम्यान रेशीम शेती करण्यास इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणीही करून घेतली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 15 डिसेंबरपर्यंत लातूर जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन श्री. वराट यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु