मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर · 9 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध · 8 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणार · अंतिम यादी मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार

 

                                                                                                       

                        मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

·        9 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध

·        8 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणार

·        अंतिम यादी मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार 

लातूरदि. 07 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2022  रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. 9 नोव्हेंबर ते दिनांक 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून या दावे व हरकती निकाली काढून 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान सन 2023 मध्ये जानेवारीएप्रिलजुलैऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा र्यापुर्वी वयाची 18 पूर्ण करणाऱ्या नागरिकांना नमुना अर्ज क्र. 6 भरून आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झाली नसल्यास अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मतदार म्हणून आपले नाव नोंदवता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2023 अंतर्गत 19 आणि 20 नोव्हेंबर 2022, तसेच 3 आणि 4 डिसेंबर 2022 रोजी मतदार नोंदणीसाठी चार विशेष शिबिरे आयोजित केली जातील. 10 नोव्हेंबर 2022 रोजी लातूर जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित कारण्यात येणार असून ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. 12 आणि 13 नोव्हेंबर 2022 रोजी विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्यासाठी 26 आणि 27 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष शिबीर आयोजित केले जाईल.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नागरीकांकडून नाव नोंदणीबाबतचे अर्ज स्विकारण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओयांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलएयांना या मोहिमेस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास सहायक मतदार यादी निरीक्षक तथा सहायक आयुक्त (चौकशी), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद हे दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी 11.30 वाजता मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक होईल.

 छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. त्यामुळे मतदार ओळखपत्र असले तरीही नागरिकांनी मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा किंवा Voter Helpline App या मोबईल अॅपचा वापर करावा. तसेच9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणारी प्रारूप मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओयांचेकडे उपलब्ध करुन देण्यात आली असून यामध्येही आपले नाव असल्याची खात्री करता येईल.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी Voter Helpline App या मोबाईल अॅप किंवा https://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

लातूर जिल्ह्यातील 1जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिकसन 2023 च्या जानेवारीएप्रिलजुलैऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्यापूर्वी 18 वर्षाचे होणारे युवा मतदार व अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी मोहिमेत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज भरून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावेअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु