जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
· परस्पर सामंजस्याने वाद सोडविण्याची संधी
लातूर, दि. 10 (जिमाका): जिल्हा सत्र न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये 12 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा
ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 6 हजार 348 प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार
आहेत.
धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे
(आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून), आपसात तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात
नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भु-संपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे, मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद इत्यदी
प्रकरणांवर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणी होईल.
Comments
Post a Comment