जिल्ह्यात बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे आयोजन

 जिल्ह्यात बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे आयोजन

 

*लातूर, दि. 15 (जिमाका) :-* कामगार आयुक्त यांच्या आदेशानुसार बालदिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर ते                20 नोव्हेंबर 2022 दरम्यान बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी लातूर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. औरंगाबाद विभागाचे कामगार उपायुक्त चं.अं. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कामगार विरोधी सप्ताह राबविण्यात येणार असल्याचे सहायक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले यांनी कळविले आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात, प्रकियेत कामावर ठेवणे गुन्हा आहे. बालकांना कामावर ठेवल्यास नियोक्त्यांना सहा महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किवा वीस हजार ते पन्नास हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.  जिल्हातील विटभट्टी, खडीक्रशर, हॉटेल, दुकाने, चहाटपरी, गॅरेज इत्यादी ठिकाणी धाडसत्र राबवून हॉटेल असोसिएशन, दुकाने व व्यापारी असोसिएशन, औद्योगिक क्षेत्रातील मन्युफॅक्चरींग असोसिएशन्स आणि कामगार संघटना यांच्या बैठका आयोजित करून सुधारीत बालकामगार अधिनियमातील तरतुदींची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या बैठकांमधून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत सामुहिक शपथ देण्यात येईल.

कोणत्याही आस्थापनेत बालकामगार आढळून आल्यास तात्काळ कामगार विभागास किंवा पोलीस विभागास कळवून लातूर जिल्हा बालकामगारमुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा बाल कामगार कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. आणि पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, सहायक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले यांनी केले आहे.   

**** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु