निवृत्तीवेतनधारकांनी बचतीची माहिती

5 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवा

 

लातूर, दि. 29 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालय अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच माजी विधानसभा सदस्य आणि माजी विधानपरिषद सदस्य आदी राजकीय निवृत्तवेतनधारकांनी 2022-23 मधील वार्षिक निवृत्तीवेतन पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, जुन्या किंवा नवीन पद्धतीने विकल्प निवडून लातूर जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. तसेच अशा  निवृत्तीवेतन धारकांनी सन 2022-23 मध्ये केलेल्या बचतीची माहिती योग्य त्या पुराव्यासह व पॅन क्रमांक, बँक शाखा व पी.पी.ओ. नंबरसह 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी केले आहे.

            बचतीची माहीती 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर न केल्यास नियमानुसार निवृत्तीवेतनातून आयकर कपात करण्यात येणार आहे. अद्याप कोषागार कार्यालयास पॅन क्रमांक सादर न केलेल्या आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांचा आयकर अधिनियम 206 एए नुसार 20 टक्के दराने आयकर कपात करण्यात येईल. तरी  अशा निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहिती विहीत कालावधीत लातूर कोषागार कार्यालयात उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन श्री. राऊत  यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु