Posts

Showing posts from April, 2024

जिल्ह्यात 11 आणि 14 एप्रिल रोजी मद्यविक्री बंद

    जिल्ह्यात 11 आणि 14 एप्रिल रोजी मद्यविक्री बंद लातूर ,   दि .   10 :  जिल्ह्यात 11 एप्रिल 2024 रोजी (एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार) रमजान ईद आणि 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. सण, जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी या दोन्ही दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्रीअनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत.

निवडणूक प्रचाराबाबत विविध परवानग्या देण्यासाठी लातूर पंचायत समिती येथे एक खिडकी कक्ष स्थापन

  निवडणूक प्रचाराबाबत विविध परवानग्या देण्यासाठी लातूर पंचायत समिती येथे एक खिडकी कक्ष स्थापन लातूर ,   दि .   10 :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून 41-लातूर लोकसभा (अ.जा.) मतदारसंघाची निवडणूक 7 मे ,  2024 रोजी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने 235- लातूर शहर मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांना सभा ,  रॅली ,  पदयात्रा ,  पोस्टर ,  बॅनर इत्यादी विविध बाबींच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लातूर पंचायत समितीच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवारांना प्रचाराच्या अनुषंगाने सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात ,  यासाठी लातूर शहर मतदारसंघा अंतर्गत एक खिडकी कक्ष लातूर शहर महानगरपालिका याठिकाणी करण्यात आलेला होता. परंतु, काही प्रशासकीय कारणास्तव हा कक्ष लातूर पंचायत समिती कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापन क...

लातूर जिल्ह्यात गाव ते शहर झाला मतदान जागृतीचा जागर !

  लातूर जिल्ह्यात गाव ते शहर झाला मतदान जागृतीचा जागर ! ·           ‘माझा एक दिवस मतदार जागृतीसाठी’ उपक्रम ·           महिला मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात सर्वत्र एकाचवेळी रॅली ·           शहरी, ग्रामीण भागात सुमारे 20 हजार महिला, विद्यार्थिनींचा सहभाग लातूर ,   दि .   08 :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ‘माझा एक दिवस मतदार जागृतीसाठी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या निर्देशानुसार महिला मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात एकाच वेळी ग्रामीण आणि शहरी भागात मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 20 हजार महिला, युवती आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. लातूर येथे झालेल्या रॅलीचा समारोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. लातूर...
Image
                                   जागतिक ऑटीझम दिननिमित्त आयोजित मोफत ऑटिझम आरोग्य शिबीर, कार्यशाळेला प्रतिसाद ·          ऑटीझम आजाराच्या 42 बाल रुग्णांवर उपचार लातूर, दि. 6 :  जिल्हा बाल विकास व उपचार केंद्र (डीईआयसी) आणि उमंग ईन्स्टीट्यूट ऑफ अॅन्ड मल्टीडिसेबिलीटी रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी जागतिक ऑटीझम दिननिमित्त आयोजित मोफत ऑटिझम आरोग्य शिबिराचे व कार्यशाळाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते. शाळा व अंगणवाडीतील तपासणीमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय पथकाने डीईआयसी केंद्र येथे संदर्भात केलेले ऑटीझम आजाराच्या एकूण 42 बाल रुग्णावर चाईल्ड न्यूरोलॉजीस्ट डॉ. प्रशांत उटगे व बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक धुमाळ यांनी तपासणी करून योग्य उपचार केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या...

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण

  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण लातूर ,   दि .   06 :   लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर   मतदारसंघामध्ये   नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी संगिता टकले ,   सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे ,   मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे ,   नायब तहसिलदार पंकज मांदाडे यावेळी उपस्थित होते. सूक्ष्म निरीक्षकांना निवडणूक प्रक्रियेची माहिती ,   निवडणूक नियमांचे पालन कसे करावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी घ्यावयाची काळजी ,   मॉकपोल कसे घ्यावे, याबाबत प्राथमिक प्रशिक्षण याप्रसंगी देण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी सूक्ष्म निरीक्षकांची संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत मतदान कक्षात मतदान केंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी ...

मतदार जागृतीसाठी सोमवारी जिल्ह्याभर रॅलीचे आयोजन

  मतदार जागृतीसाठी सोमवारी जिल्ह्याभर रॅलीचे आयोजन ·           एकाच दिवशी सकाळी ८ वाजता जिल्ह्यात होणार मतदानाचा जागर लातूर ,   दि .   06 :   लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवार, 8 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता जिल्ह्यामध्ये गाव ते जिल्हास्तरावर मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होणार असून एकाच दिवशी, एकाच वेळी जिल्ह्याभर मतदार जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. *****

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजकीय पक्ष प्रतिनिधींना विविध बाबींविषयी मार्गदर्शन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन

Image
  लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजकीय पक्ष प्रतिनिधींना विविध बाबींविषयी मार्गदर्शन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन लातूर ,   दि .   05 :   लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे आणि संगीता टकले, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, लातूरच्य उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज ...

सामाजिक सलोखा, शांतता कायम ठेवून जयंती, सण साजरे करा -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
सुधारीत सामाजिक सलोखा, शांतता कायम ठेवून जयंती, सण साजरे करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक लातूर, दि. 04 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतीराव फुले जयंती, श्रीराम नवमी आणि रमजान ईद आदी सण, जयंती उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करीत हे जयंती, सण साजरे करावेत. या काळात सामाजिक सलोखा, शांतता कायम राखून लातूर जिल्ह्याची परंपरा जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतीराव फुले जयंती, श्रीराम नवमी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सर्व समाज प्रतिनिधी, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या शांतता समितीच्या  बैठकीत श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब  मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह भंते भिक्खु पय्यानंद थेरो, व...

चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिकासाठी अर्ज आमंत्रित

  चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिकासाठी अर्ज आमंत्रित लातूर, दि. 02 :  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झेलेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेले) , निवृत्त न्यायाधिश, वकील, चार्टर्ड अकौटंट यांच्याकडून  अर्ज   मागविण्यात आले आहेत. अर्जाचा विहित  नमुना  विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग ,  लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर  आणि  संबंधित जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात 1 एप्रिल, 2024 ते  30 एप्रिल, 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील व भरलेली परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह उक्त कालावधीत संबंधित कार्यालयात सादर करण्यात  यावे त.  याबाबतची जाहिर सुचना  विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था   कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक...
Image
 जागतिक ऑटीझम दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरीद्वारे मतदार जागृती पथनाट्याद्वारे मतदारांना आवाहन; 12 शाळांतील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग लातूर, दि. 02 : जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने जागतिक ऑटीझम दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यासह लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरातील 12 दिव्यांग शाळेतील 350 विद्यार्थ्यांनी विविध मतदान जनजागृतीचे फलक हाती घेवून प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. क्रीडा संकुलापासुन सुरू झालेल्या या प्रभातफेरीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. यावेळी स्वीप समितीचे नोडल अधिकारी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकव...

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
 नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कडक कार्यवाही करण्याच्या सूचना * बांधकामासाठी पाणी वापरावर निर्बंध आणण्याच्या सूचना लातूर, दि. 01 : जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेवून नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. अवैध पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी संयुक्त पथके स्थापन करण्यात आली असून याविषयीची मोहीम अधिक कडक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालामध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, कार्यकारी अभियंता अमर पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. ...