जागतिक ऑटीझम दिननिमित्त आयोजित
मोफत ऑटिझम आरोग्य शिबीर, कार्यशाळेला प्रतिसाद
· ऑटीझम आजाराच्या 42 बाल रुग्णांवर उपचार
लातूर, दि. 6 : जिल्हा बाल विकास व उपचार केंद्र (डीईआयसी) आणि उमंग ईन्स्टीट्यूट ऑफ अॅन्ड मल्टीडिसेबिलीटी रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी जागतिक ऑटीझम दिननिमित्त आयोजित मोफत ऑटिझम आरोग्य शिबिराचे व कार्यशाळाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते.
शाळा व अंगणवाडीतील तपासणीमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय पथकाने डीईआयसी केंद्र येथे संदर्भात केलेले ऑटीझम आजाराच्या एकूण 42 बाल रुग्णावर चाईल्ड न्यूरोलॉजीस्ट डॉ. प्रशांत उटगे व बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक धुमाळ यांनी तपासणी करून योग्य उपचार केले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर स्त्री रुग्णालय येथील जिल्हा बाल विकास व उपचार केंद्रात उपलब्ध मोफत आरोग्य सेवांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी यावेळी केले.
*****
Comments
Post a Comment