Posts

Showing posts from November, 2024

जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन लातूर, दि. 27 (जिमाका) :   जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, उमंग मल्टीडिसेबिल्टी सेंटर व दिव्यांग शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर, हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 2 ते 9 डिसेंबर, 2024 दरम्यान दिव्यांग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने लेबर कॉलनी येथील शासकीय अंध विद्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांची समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याणचे अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.   यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट ब विलास केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठकी घेण्यात आली. यात जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून विविध कल्पना घेण्यात आल्या. यासह 2 ते ...

महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

                                                              महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. 27 (जिमाका) :  महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2024 रविवार, दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता ते दुपारी 12 पर्यंत व दुपारी 3 ते 5 पर्यंत दोन सत्रामध्ये आयोजित केलेली आहे. त्याअनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  लातूर शहरात बार्शी रोड येथील दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड बीसीए , अंबोजोगाई रोड लातूर येथील कॉलेज ऑफ कम्प्युटर सायंस अँन्ड इन्फॉरमेशन टेक्नालॉजी (कॉक्सिट), नांदेड रोड येथील यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, नारायण नगर येथील परिमल माध्यमिक विद्यालय, रिंगरोड येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद...

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 27 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 26 नोव्हेंबर, 2024 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  10 डिसेंबर, 2024  रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.    शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करण...

भारतीय यंग लीडर्स डायलॉग चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन

  भारतीय यंग लीडर्स डायलॉग चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन लातूर, दि.  27   :      भारत सरकारमार्फत विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून  “ राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 ”  आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान देशभरातून निवडलेले 3 हजार तरुण, तरुणी 12 व 13 जानेवारी, 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे मा. पंतप्रधान यांच्यासमोर विकसित भारत विषयी त्यांचे व्हिजन मांडतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याची व शिकण्याची अनेक संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताविषयी त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तरुणांना सर्वोच्च निर्णय घेणारे आणि प्रसिध्द जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्वाशी जोडणे आणि विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांना सक्षम करणे असा आहे. चार टप्प्यात होणार निवड विकसित भारत यंग लीडर्स चर्चासत्राच्या माध्यमातून या तरुणाची चार टप्प्यात विकसित भारत प्रश्न मंजुषा ऑनलाईन पध्दतीने आयो...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवर अशासकीय माळी पदाची भरती

                                                              जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवर अशासकीय माळी पदाची भरती लातूर, दि.  27   :     जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , लातूर यांचे आस्थापनेवरील माजी सैनिक विश्रामगृह, मल्टीपरपज हॉल येथे अशासकीय माळी पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमाहा रक्कम रुपये 13 हजार 89 प्रमाणे भरण्यात येणार आहे. ज्यांना माळी कामाचा अनुभव असेल, अशा महिला उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छूक माजी सैनिक, विधवा व नागरी जीवनातील पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 3 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे स्वत: उपस्थित राहावे निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे. ****

स्टँड अप इंडिया अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील मार्जिन मनी योजना

  स्टँड अप इंडिया अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील  मार्जिन मनी योजना     लातूर, दि. 26   :     केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 मार्च, 2020 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेकरिता नवउद्योजक इच्छूक लाभार्थ्यींनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुन करावा. 31 डिसेंबर, 2024 पूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्या कार्यालयात आपला प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.   ***  

मोटार सायकल वाहनांकरिता एम.एच.24-सीए नवीन मालिका सुरु आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                                             मोटार सायकल वाहनांकरिता एम.एच.24-सीए नवीन मालिका सुरु   आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन   लातूर, दि.  26   :      परिवहनेत्तर (मोटार सायकल) संवर्गातील वाहनांकरिता एम.एच.24-सीए ही नवीन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील आकर्षक,पसंती क्रमांक राखीव करण्यासाठी बुधवार, 27 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे. ***

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

  महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर ,  दि. 25 :  महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क ,  परीक्षा शुल्क (फ्रीशिप) ,  राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ,  व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचा लाभ दिला जातो. या योजनांसाठी सन 2024-25 या वर्षासाठी नवीन अर्ज भरण्यासाठी 25 जुलै 2024 पासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. 8 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार संबंधित महाविद्यालयांत राबविण्यात येणारे अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्कांची मंजूरी ,  विद्यापिठांमार्फत दिली जाणारी इतर शुल्काची मंजूरी व शैक्षणिक विभाग ,  शासकीय यंत्रणा यांचेकडून घेण्यात येणारी मंजूरी या सर्व बाबींची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपीक कर्मचारी यांची असल्याने या कामकाजास प्राधान्य देण्यात यावे. महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्...

संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

  संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन लातूर ,  दि. २५ :  भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता तसेच संविधानाची मुल्ये शालेय ,  महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरीक यांच्यापर्यंत पोहचावीत, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत संविधाना दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता संविधान रॅलीने या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. राज्यातील शाळा ,  महाविद्यालये ,  शैक्षणिक संकुले तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था ,  महाराष्ट्र विधान परिषद, विधान सभा अशा सर्व ठिकाणी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ अंतर्गत ‘घर घर संविधान’ उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २६ नोव्हेंबर ,  २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन ...

लातूर येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात निवासी अशासकीय वसतिगृह अधीक्षक पदभरती

  लातूर येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात निवासी अशासकीय वसतिगृह अधीक्षक पदभरती   लातूर ,   दि. 25 (जिमाका) :   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवरील माजी सैनिक मुलांचे वसतिगृह ,   लातूर येथे निवासी अशासकीय वसतिगृह अधिक्षक पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम रुपये 31 हजार 875 प्रमाणे भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छूक माजी सैनिक (फक्त जेसीओ) उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 3 डिसेंबर ,   2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे स्वत: उपस्थित रहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे ,   असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. *****