लातूर येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात निवासी अशासकीय वसतिगृह अधीक्षक पदभरती

 लातूर येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात

निवासी अशासकीय वसतिगृह अधीक्षक पदभरती

 

लातूर, दि. 25 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवरील माजी सैनिक मुलांचे वसतिगृह, लातूर येथे निवासी अशासकीय वसतिगृह अधिक्षक पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम रुपये 31 हजार 875 प्रमाणे भरण्यात येणार आहे.

या पदासाठी इच्छूक माजी सैनिक (फक्त जेसीओ) उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 3 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे स्वत: उपस्थित रहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन