जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लातूर, दि. 27 (जिमाका) :  जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, उमंग मल्टीडिसेबिल्टी सेंटर व दिव्यांग शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर, हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 2 ते 9 डिसेंबर, 2024 दरम्यान दिव्यांग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने लेबर कॉलनी येथील शासकीय अंध विद्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांची समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याणचे अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.  

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट ब विलास केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठकी घेण्यात आली. यात जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून विविध कल्पना घेण्यात आल्या. यासह 2 ते 9 डिसेंबर, 2024 दरम्यान विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता  राजू गायकवाड यांनी तर आभार सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांनी मानले.

3 डिसेंबर रोजी सांस्कृतिक स्पर्धा  

दिव्यांग सप्ताह अंतर्गत 9 कार्यक्रम घेण्यात येणार असून 2 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात दिव्यांग विद्याल्यांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उमंग मल्टीडिसेबिलिटी सेंटर येथे डोरमेन्ट्री हॉलचे उद्घघाटन होणार असून दुपारी 1 वाजता स्व. दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह येथे दिव्यांग शाळेतील मुला-मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.   

4 डिसेंबर रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे उमंग मल्टीडिसेबिलिटी सेंटर येथे दिव्यांग मुलांसाठी आनंद नगरी व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 4 व 5 डिसेंबर रोजी सुआश्रय निवासी अस्थिव्यंग विद्यालय इंडिया नगर येथे भौतिक उपचार शिबीर होणार आहे. 5 डिसेंबर रोजी 11 ते 2 दरम्यान दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कायदेविषयक कार्यशाळचे आयोजन व दुपारी 4 वाजता दिव्यांग मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उमंग मल्टीडिसेबिलिटी सेंटर येथे करण्यात येणार आहे.

6 व 7 डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांचे उपचार शिबीर, वैद्यकीय तपासणी, वाचा व श्रवण तपासणी, कृत्रिम अवय मोजमाप, बुध्दांक तपासणी व समुपदेशन होणार आहे. 9 डिसेंबर रोजी श्री केशवराज विद्यालयात 21 प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गाची माहिती प्रदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.

****  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा