संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

 संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

लातूरदि. २५ : भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता तसेच संविधानाची मुल्ये शालेयमहाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरीक यांच्यापर्यंत पोहचावीत, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत संविधाना दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता संविधान रॅलीने या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

राज्यातील शाळामहाविद्यालयेशैक्षणिक संकुले तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थामहाराष्ट्र विधान परिषद, विधान सभा अशा सर्व ठिकाणी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ अंतर्गत ‘घर घर संविधान’ उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन शहरातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संविधान रॅली काढण्यात येणार आहे.

संविधान रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपा‍लिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, यावेळी उपस्थित राहणार आहे. तरी या रॅलीस सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा