जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवर अशासकीय माळी पदाची भरती

                                                             जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या

आस्थापनेवर अशासकीय माळी पदाची भरती

लातूर, दि. 27 :   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , लातूर यांचे आस्थापनेवरील माजी सैनिक विश्रामगृह, मल्टीपरपज हॉल येथे अशासकीय माळी पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमाहा रक्कम रुपये 13 हजार 89 प्रमाणे भरण्यात येणार आहे. ज्यांना माळी कामाचा अनुभव असेल, अशा महिला उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

तरी इच्छूक माजी सैनिक, विधवा व नागरी जीवनातील पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 3 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे स्वत: उपस्थित राहावे निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा