भारतीय यंग लीडर्स डायलॉग चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन

 भारतीय यंग लीडर्स डायलॉग चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन

लातूर, दि. 27 :    भारत सरकारमार्फत विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान देशभरातून निवडलेले 3 हजार तरुण, तरुणी 12 व 13 जानेवारी, 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे मा. पंतप्रधान यांच्यासमोर विकसित भारत विषयी त्यांचे व्हिजन मांडतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याची व शिकण्याची अनेक संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताविषयी त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तरुणांना सर्वोच्च निर्णय घेणारे आणि प्रसिध्द जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्वाशी जोडणे आणि विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांना सक्षम करणे असा आहे.

चार टप्प्यात होणार निवड

विकसित भारत यंग लीडर्स चर्चासत्राच्या माध्यमातून या तरुणाची चार टप्प्यात विकसित भारत प्रश्न मंजुषा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली जाईल. ज्यामध्ये वय वर्षे 15 ते 29 वयोगटातील युवक https://mybharat.gov.in पोर्टलवर नोंदणी करुन भाग घेवू शकतात. पहिल्या टप्यातील निवडलेले तरुण दुसऱ्या टप्यातील विकास भारत ब्लॉग, निबंध स्पर्धेत सहभागी होतील, आणि तिसऱ्या टप्यातील विजेते अंतिम टप्यातील विकसित भारत राष्ट्रीय चॅम्पिअनशिपमध्ये सहभागी होतील. पहिला टप्पा 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत भारत सरकारच्या पोर्टलवर आयोजित केला जाईल. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व युवकांना राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 विकास भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लातूर नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैय्या यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा