लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती लातूर , दि. 30 : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि इंडियन डेंटल असोसिएशन लातूर जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संगीता टकले होत्या. जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप कुलकर्णी , उपजिल्हा निवडणूक अधिकारी पंकज मंदाडे, तहसीलदार राजाभाऊ कदम , ज्ञानेश्वर काकडे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी , इंडियन डेंटल असोसिएशनचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. शिल्पा लठुरिया , सचिव डॉ. शैलेश पडगिलवार , डॉ. साफल्य कडतने , डॉ. नीलम जाधव , जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. अरुण बालकुंदे , डॉ. आनंद कलमे , डॉ. माधुरी आदी मान्यवर उपस्थ...