भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबईदि.4  :- भारत हा मोशन पिक्चर असोसिएशनसोबत भागीदारी वाढवून जागतिक स्तरावर सुरक्षित सर्जनशील उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक आहेअसे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी केले

मुंबईत सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या अर्थात वेव्हज् 2025 च्या तिसऱ्या दिवशीमोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीएभारताच्या चित्रपटदूरदर्शन आणि ओटीटी क्षेत्रांचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शवणारा एक सर्वसमावेशक अहवाल सादर केलाया अहवालाच्या प्रकाशन समारंभाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉएलमुरुगन आणि एमपीएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिव्हकिन उपस्थित होते.

डॉमुरुगन यांनी एमपीएच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांवर वाढता प्रभाव मान्य केलाभारतीय कथा भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन प्रभाव पाडू शकतात हे आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांनी सिद्ध केले आहे, असे डॉमुरुगन म्हणालेधोरणेनिर्मिती प्रोत्साहन आणि मजबूत बौद्धिक संपदा संरक्षणाद्वारे सर्जक-प्रथम परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिलाअलीकडील पायरसीविरोधी सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी डिजिटल युगात कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.

चार्ल्स रिव्हकिन यांनी भारताच्या मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वपूर्ण क्षण असलेल्या या काळात एमपीएच्या भारतासोबतच्या सातत्यपूर्ण भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केलाभारताची सर्जनशील अर्थव्यवस्था अभूतपूर्व वाढीच्या उंबरठ्यावर आहे आणि या प्रवासाला पाठिंबा देणे एमपीएसाठी अभिमानास्पद आहे, असे रिव्हकिन म्हणालेभारतीय चित्रपटदूरदर्शन आणि ओटीटी उद्योगांनी 26 लाख रोजगारांना आधार दिला आणि वार्षिक आर्थिक उत्पादनात 60 अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवले.


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन