लातूरमध्ये ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’साठी अत्याधुनिक सायलो व गोदामांची उभारणी

 लातूरमध्ये ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’साठी अत्याधुनिक सायलो व गोदामांची उभारणी

लातूर, दि. 14 (जिमाका) : लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’ विकसित करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत लातूर एमआयडीसी परिसरात 10 हजार मेट्रिक टन क्षमतेचा सायलो प्रकल्प आणि अत्याधुनिक गोदामपानगाव येथे हजार मेट्रिक टन क्षमतेचे नवीन वखार केंद्रतसेच चापोली येथे हजार 200 मेट्रिक टन क्षमतेचे आधुनिक गोदाम उभारण्यात येत आहे.

2024 मध्ये नाफेडच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली. या खरेदीचे साठवणूक नियोजन वखार महामंडळाने स्वमालकीच्या आणि दुप्पट क्षमतेने भाड्याच्या गोदामांद्वारे यशस्वीपणे पार पाडले. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला. मात्रपारंपरिक गोदामांच्या मर्यादित क्षमतेमुळे आधुनिक साठवण सुविधांची गरज निर्माण झाली आहे.

वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेतकरी हितासाठी सायलो आणि आधुनिक गोदामांच्या उभारणीचे निर्देश दिले. मे 2025 रोजी राज्यस्तरीय आढावा बैठकीत पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यापुढे या योजनेचे सादरीकरण करण्यात आले. लातूर एमआयडीसीतील सायलो प्रकल्प हा मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृती आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट आहे. सायलो बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात असूनराज्य शासनाच्या स्मार्ट योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.

पानगाव येथील वखार केंद्रासाठी बाजार समितीची जागा उपलब्ध झाली असूननिविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चापोली येथील गोदामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असूनलवकरच बांधकामास सुरुवात होईल. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना उत्तम दर मिळेपर्यंत माल साठवण्याची सुरक्षित व्यवस्थागुणवत्ता संरक्षणवखार पावती आधारित कर्ज सुविधा आणि डिजिटल साठवण प्रणालीचा लाभ मिळेल.

10 मे 2025 रोजी दिवेगावकर यांनी लातूर एमआयडीसी आणि पानगाव येथे भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला आणि प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. येत्या काही महिन्यांत हे प्रकल्प पूर्ण होऊन लातूर जिल्हा राज्यातील अन्नधान्य साठवण हब म्हणून उदयास येईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन