लातूर येथे 23 ते 25 मे दरम्यान जी.डी.सी. अँन्ड ए. परीक्षा; प्रवेश पत्रासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 लातूर येथे 23 ते 25 मे दरम्यान जी.डी.सी. अँन्ड ए. परीक्षा;

प्रवेश पत्रासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूरदि. 20 (जिमाका): सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थामहाराष्ट्र राज्यपुणे यांच्या कार्यालयामार्फत दि. 23, 24 व 25 मे 2025 रोजी जी.डी.सी. अँन्ड ए. परीक्षा लातूर येथील श्री. मारवाडी राजस्थान विद्यालयशासकीय रुग्णालयासमोरसिग्नल कँम्प येथील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे.

ज्या परीक्षार्थींना अद्याप हॉल तिकिट मिळालेले नाही किंवा मोबाइलद्वारे संदेश प्राप्त झालेला नाहीअशांनी स्वतःचा एक फोटो आणि पॅनकार्डनिवडणूक मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्थामध्यवर्ती प्रशासकीय इमारतजुने जिल्हाधिकारी कार्यालयलातूर येथे हॉल तिकिट प्राप्त करावे. तसेचपरीक्षेच्या दिवशी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावरील कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02382-245193 वर संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व चिफ कंडक्टरजी.डी.सी. अँन्ड ए. परीक्षालातूर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन