वेव्हज - 2025 : कथाकथनाच्या भविष्याबाबत जागतिक संवादाला मिळाली चालना

·         जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा विशेष चर्चासत्र

  • प्रसारणचित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ

मुंबईदि. ३ :- पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या वेव्हज २०२५ शिखर परिषदेत  जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा या विषयावर आधारित सत्रात विविध क्षेत्रातील मते ऐकण्याची संधी  मिळाली. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नालवॉल्ट डिस्ने कंपनीचे ईव्हीपी तसेच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टीन वॉरब्रूकअॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डेबीबीसी स्टुडीओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हार्डमनप्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी,  गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि राजनीती तज्ज्ञ अनिश त्रिपाठी यांनी चर्चा संचालक म्हणून या चर्चेत  भाग घेतला.

कथाकथनातील परिवर्तनशील घटकांचा शोध घेण्यासाठी या सत्राने जागतिक माध्यमेमनोरंजन आणि साहित्य विश्वातील अनेक दूरदर्शी नेते आणि कथाकथनात प्रभुत्व मिळवलेले वक्ते यांना एकत्र आणले. विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील  कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगत यांच्यात गाजलेल्या वक्त्यांनी गुंगवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीने सीमापार प्रवास करुन संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबद्दलचे विचारधन सामायिक केले.

या कार्यक्रमातील चर्चेने जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मकसर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टीकोनसंस्कृती तसेच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला.

जगभरातील प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी विज्ञानशोध तसेच दृश्य कथाकथन यांची वीण असलेल्या सशक्त कथा निर्माण करण्यासाठीची धोरणात्मक दृष्टी केटलिन यार्नाल (नॅशनल जिओग्राफिक) यांच्याकडे आहे. उपरोल्लेखित चर्चेदरम्यान त्यांनी कथाकथन क्षेत्राची सत्यता तसेच उत्कृष्टता यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला. तसेच त्यांनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलासा वाटेल अशा आशयाच्या निर्मितीत असलेली आव्हाने आणि संधी अशा दोन्हींवर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.

जस्टिन वारब्रुक (वॉल्ट डिस्ने) यांनी भारतीय बाजारपेठेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि वेगाने वाढणारी माध्यम आणि मनोरंजन बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी डिस्नेच्या भारतीय कंपन्यांबरोबरच्या सहकार्याबद्दलही सांगितलेआणि ही भागीदारी परस्परांच्या संस्कृतीला जोडण्यासाठी आणि कथाकथनाच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी कशी सहाय्य करत आहेयावर भर दिला.

केली डे (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) यांनी जागतिक विस्तार आणि आशय सामग्री विषयक धोरणविविध खंडांमधील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर गुंफलेल्या कथा आणण्याचे काम कसे करतेयावर आपले विचार मांडले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या कथा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतीलहे व्यासपीठ ठरवते.  सशक्त कथाकथनस्थानिक प्रेक्षकांचा कल ओळखणे आणि योग्य स्वरूप आणि शैली निवडणे यात यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

फिल हार्डमन (बीबीसी स्टुडिओआशिया) आशियाई प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या निवडक ब्रिटिश सामग्रीच्या वितरणाचे प्रमुख आहेत. त्यांनी दर्जेदार सामग्रीच्या शाश्वत सामर्थ्याबद्दल बोलतानात्यांनी बीबीसीच्या शिक्षण आणि माहिती देण्याच्या मुख्य मिशनवर भर दिला. त्या ध्येयाला अनुसरून अर्थपूर्ण कथांचा शोध घेऊन त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक्‍ राजकुमार हिरानी म्हणाले कीकथाकथन हे स्वाभाविकपणे व्यक्तीनिष्ठ असतेत्याचा प्रतिध्वनी व्यक्तीनुरूप वेगळा असतो.  कृत्रिम बुद्धीमत्तेबद्दल आपण आशावादी असूनसर्जनशीलता आणि कथाकथन शैलीत भर घालणारे हे एक मौल्यवान  साधन असल्याचे ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन