दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेतून दोन जोडप्यांना अर्थसहाय्य


 दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेतून दोन जोडप्यांना अर्थसहाय्य

लातूरदि. 14 (जिमाका): सामाजिक भेदभाव कमी करून समतोल आणि सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दोन जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते बुधवारी हा धनादेश वितरण समारंभ पार पडला.

या योजनेअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील हिप्परगा येथील सोमनाथ हरिकिशन नागरगोजे आणि कोमल लक्ष्मण केंद्रेतसेच लातूर येथील विजय तुकाराम मोरे आणि पूजा पांडूरंग भोसले या जोडप्यांना लाभ मिळाला. 2024-25 या वर्षात 20 जोडप्यांना एकूण 10 लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. प्रत्येक जोडप्याला 25 हजारांचा धनादेश आणि 25 हजारांचे बचत पत्र असे एकूण 50 हजार रुपये रक्कम दिली जाते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे. धनादेश वितरण समारंभात समाज कल्याण निरीक्षक विक्रम जाधववरिष्ठ लिपिक वर्षा जोगदंडकनिष्ठ लिपिक शिवराज गायकवाडप्रशांत चामेमहेश पाळणेरामनारायण भुतडाज्ञानेश्वर रावप्रदिप संमुद्रेश्रीकांत उंबरे आणि गणेश पाटील उपस्थित होते.

***** 


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन