Posts

Showing posts from November, 2025

जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी सायकल रॅली · १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन

जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी सायकल रॅली · १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन लातूर, दि. २८ (जिमाका) : महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही, एड्स जनजागृतीसाठी होत असलेल्या या उपक्रमाचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करून, एकजूटीने एचआयव्ही, एड्सला लढा देवू, नवं परिवर्तन घडवू’ असे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सायकल रॅलीला सुरुवात होईल. या रॅलीत लातूरमधील सायकल क्लब, विद्यार्थी, स्थानिक सामाजिक संस्था, मान्यवर व्यक्ती, शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच रॅलीच्या समारोप प्रसंगी रेड रिबन क्लब विद्यार्थीमार्फत जगजागृतीपर फ्लॅश मॉब कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सायकल रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २ डिसेंबर रोजी आयोजन; १ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करावी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २ डिसेंबर रोजी आयोजन; १ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करावी लातूर, दि. २८ (जिमाका) : युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्वामध्ये राज्याचा प्रातिनिधीक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर, २०२५ रोजी लातूर येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाची विभागीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धकांचे प्रवेश अर्ज १ डिसेंबर, २०२५ रोजी पर्यंत क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो. ९९७५५६६००) यांच्याकडे सादर करावेत. जिल्ह्यामधील सर्व शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छूक कलावंताना, स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येईल. समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व (भारतातील आणीबा...

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक असलेल्या मतदारसंघात २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक असलेल्या मतदारसंघात २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने या मतदारसंघांमधील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, दि. २८ : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजवणी सुरु असल्यामुळे १ डिसेंबर, २०२५ रोजी लोकशाही दिन स्थगित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारास १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुभा

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारास १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुभा लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर प्रचाराबाबत सुधारित सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या निवडणुकीचा जाहीर प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता जाहीर प्रचार बंद होईल. त्यानंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी, प्रसारणदेखील बंद होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून रेणापूर येथील मतदान पक्रीयेचा आढावा

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून रेणापूर येथील मतदान पक्रीयेचा आढावा · मतदार जागृती कार्यक्रमाला उपस्थिती · स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी लातूर, दि. २८ : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज रेणापूर नगरपंचायत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेणापूर येथील मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी केली. तसेच स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत थोरात, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त अजित डोके, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन भुजबळ, नायब तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी यादव, गट विकास अधिकारी सुमित जाधव, गट शिक्षणाधिकारी कृष्णा भराडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदार जागृतीसाठी प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी उपस्थिती लावली. शासकीय आयटीआय येथील स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्र परि...

लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी परीक्षा होणार

लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी परीक्षा होणार · इयत्ता सहावीच्या ८० जागासाठी परीक्षेचे आयोजन लातूर दि. २७ : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र वेबसाइटवर उपलब्ध झाले असून ते डाउनलोड करून घेण्याचे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गणपती मस्के यांनी केले आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावीसाठी ऑनलाइन पद्धतीने दाखल केले आहेत, त्यांची प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश पत्र वेबसाइट वरुन डाउनलोड करून घ्यावेत. प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याला उपस्थित ठेवावे. याबाबत अधिक माहितीसाठी लातूर जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून ) संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गणपती मस्के यांनी केले आहे. ****

रस्त्यांवरील खड्डेविषयक कार्यवाहीसाठी समिती गठीत

रस्त्यांवरील खड्डेविषयक कार्यवाहीसाठी समिती गठीत लातूर, दि. २७ : मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक ७१/ २०१३ मधील अंतरीम अर्ज क्र. २९११९/२०२५ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या १३ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात, मृत्यू च्याअनुषंगाने नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मंत्रालय येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या समितीचे सदस्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) हे असतील. तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हे समितीचे सदस्य राहतील, असे लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बा. मा. थोरात यांनी कळविले आहे. ****

'वंदे मातरम्' गीताचे लातूर येथे सामूहिक गायन; नागरिक, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग

Image
'वंदे मातरम्' गीताचे लातूर येथे सामूहिक गायन; नागरिक, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग लातूर, दि. ०७ (जिमाका) : कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेले ‘वंदे मातरम्’ या गीतास आज दीडशे वर्षे पूर्ण झाली, ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या या महत्वाच्या घटनेनिमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. तसेच यानिमित्ताने तयार करण्यात आलेली विशेष लघुनाटिका सादर करण्यात आली. आमदार विक्रम काळे, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, शिक्षण महर्षी वसंतराव काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. माळकुंजे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी. जे. औताडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात सकाळी ९.५० वाजता एकाच वेळी या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. लातूर जिल्हा क्र...

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. ०७ (जिमाका) : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा लातूर शहरातील ११ परीक्षा उपकेंद्रांवर रविवार, ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत होत आहे. त्याअनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. लातूर शहरातील बार्शी रोडवरील दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड बीसीए, नांदेड रोडवरील यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, नारायणनगर येथील परिमल विद्यालय, खाडगाव रिंग रोड येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, खाडगाव रोडवरील सरस्वती विद्यालय, दयाराम रोड येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, शाहू चौक येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खाडगाव रोड येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती कॉलनी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्याम नगर येथील श्री के...

दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी नोंदणी अनिवार्य

दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी नोंदणी अनिवार्य लातूर, दि. 07 : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्य करीत असले बाबत निर्दशनास आढळून आले आहे. त्यामुळे ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्य करीत आहेत, त्यांना कायदयानुसार नोंदणी करणे बंधनकारक असल्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग क्षेत्रात कार्य करु इच्छिणाऱ्या सर्व संस्थानी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करून घ्यावी, अन्यथा त्या संस्थावर कार्यवाही करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले असून त्यांच्यामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 51 व 52 नुसार नोदणी करणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार लातूर जिल्हातील ज्या संस्थेस दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, त्य...

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा लातूर, दि. 6 (जिमाका) : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता 1 ऑक्टोबर, 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार 1 ते 24 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकृतीचे कामकाज करण्यात आलेले आहे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (काँम्प्युटर बेसड टेस्ट) 13 ते 14 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेस्थळावर https://mahabhumi.gov.in या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेस्थळावर देण्यात आलेल्या सूचनानुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवरांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. सामान्य प्रशासन ...

महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम २०२५ विषयी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम २०२५ विषयी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. ०६ (जिमाका) : महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम, २०२५ या कायद्यास २८ एप्रिल, २०२५ रोजी मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, खाजगी पदयोजन एजन्सी तसेच संबंधित भागधारक यांनी या प्रारुप नियमांबाबत आपले हरकती, सूचना किंवा अभिप्राय मागविण्यात आलेले आहेत. यासाठी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या गुगल फॉर्म (Google Form) लिंकवर 11 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत संबंधितांनी त्यांच्या हरकती, सूचना किंवा अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त नि.ना.सूर्यवंशी यांनी केले आहे. ****

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी 

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी  लातूर, दि. 6 (जिमाका) :  कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 6  नोव्हेंबर, 2025 रोजीच्या  00.01 वाजेपासून ते  20 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्याम...

लातूर जिल्हा कोषागार कार्यालयात 6 नोव्हेंबर रोजी निवृत्ती वेतनधारकांची बैठक

लातूर जिल्हा कोषागार कार्यालयात 6 नोव्हेंबर रोजी निवृत्ती वेतनधारकांची बैठक लातूर, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यातील कोषागार कार्यालय यांच्या कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक व कुंटूब निवृत्तीवेतनधारक यांच्या संघटनेची 6 नोव्हेंबर, 2025 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय येथे हयात प्रमाणपत्र व निवृत्तीवेतनाविषयक अडीअडचणीबाबत बैठक आयोजित केलेली आहे. तरी लातूर जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक यांच्या राज्य शासकीय संघटनांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी आवाहन केले आहे. *

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 5 नोव्हेंबर रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 5 नोव्हेंबर रोजी बंद राहणार • 6 नोव्हेंबरपासून नियमित वेळेप्रमाणे कामकाज सुरु राहणार लातूर, दि. 3 (जिमाका) : गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बुधवार, 5 नोव्हेंबर, २०२५ रोजी बंद राहील. तसेच गुरुवार, 6 नोव्हेंबर, २०२५ पासून शासकीय सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल अंभगे यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. **

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध लातूर, दि. 03 : राज्य निवडणूक आयागाच्या 23 सप्टेंबर, 2025, 10 ऑक्टोबर, 2025 आणि 27 ऑक्टोबर, 2025 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम छापील मतदार याद्या संबंधित तहसील कार्यालय येथे माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी या अंतिम याद्यांचे अवलोकन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (समान्य प्रशासन) यांनी केले आहे. **