जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून रेणापूर येथील मतदान पक्रीयेचा आढावा
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून
रेणापूर येथील मतदान पक्रीयेचा आढावा
· मतदार जागृती कार्यक्रमाला उपस्थिती
· स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी
लातूर, दि. २८ : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज रेणापूर नगरपंचायत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेणापूर येथील मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी केली. तसेच स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत थोरात, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त अजित डोके, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन भुजबळ, नायब तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी यादव, गट विकास अधिकारी सुमित जाधव, गट शिक्षणाधिकारी कृष्णा भराडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदार जागृतीसाठी प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी उपस्थिती लावली. शासकीय आयटीआय येथील स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आदी बाबींचा जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला.
****
Comments
Post a Comment