जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २ डिसेंबर रोजी आयोजन; १ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करावी
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २ डिसेंबर रोजी आयोजन;
१ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करावी
लातूर, दि. २८ (जिमाका) : युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्वामध्ये राज्याचा प्रातिनिधीक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर, २०२५ रोजी लातूर येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाची विभागीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे.
यासाठी स्पर्धकांचे प्रवेश अर्ज १ डिसेंबर, २०२५ रोजी पर्यंत क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (मो. ९९७५५६६००) यांच्याकडे सादर करावेत. जिल्ह्यामधील सर्व शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छूक कलावंताना, स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येईल.
समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व (भारतातील आणीबाणीचा काळ आणि संविधानोचे उल्लंघन आणि लोकशाही व लोकशाही मूल्यांचे संरक्षण), कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या जिल्हास्तरावर युवा महोत्सव स्पर्धा २ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय युवा महोत्वामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक स्पर्धकांनी १ डिसेंबर, २०२५ पर्यंत आपले अर्ज लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment