नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक असलेल्या मतदारसंघात २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर
नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक असलेल्या
मतदारसंघात २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर
लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने या मतदारसंघांमधील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment