रस्त्यांवरील खड्डेविषयक कार्यवाहीसाठी समिती गठीत
रस्त्यांवरील खड्डेविषयक कार्यवाहीसाठी समिती गठीत
लातूर, दि. २७ : मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक ७१/ २०१३ मधील अंतरीम अर्ज क्र. २९११९/२०२५ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या १३ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात, मृत्यू च्याअनुषंगाने नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मंत्रालय येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या समितीचे सदस्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) हे असतील. तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हे समितीचे सदस्य राहतील, असे लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बा. मा. थोरात यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment