दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी नोंदणी अनिवार्य
दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी नोंदणी अनिवार्य
लातूर, दि. 07 : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्य करीत असले बाबत निर्दशनास आढळून आले आहे. त्यामुळे ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्य करीत आहेत, त्यांना कायदयानुसार नोंदणी करणे बंधनकारक असल्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग क्षेत्रात कार्य करु इच्छिणाऱ्या सर्व संस्थानी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करून घ्यावी, अन्यथा त्या संस्थावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले असून त्यांच्यामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 51 व 52 नुसार नोदणी करणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार लातूर जिल्हातील ज्या संस्थेस दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, त्या संस्थानी 30 नोव्हेंबर 2025 पर्यत नोंदणी करुन घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परीषद, लातूर यांच्याकडे सादर करावा. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार विना नोंदणी कार्य करणाऱ्या संस्थेवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
******
Comments
Post a Comment